यंदा देवउठनी एकादशी नंतरही लग्नाचे मुहूर्त कमी

Last Modified बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (17:45 IST)
देव उठणी एकादशी नंतर देखील लग्नाचे मुहूर्त कमी आहे. आपल्या षोडश विधीमध्ये लग्न सोहळा एक महत्त्वाचा संस्कार आहे. लग्नात योग्य आणि श्रेष्ठ जोडीदाराचे जेवढे महत्त्व आहे तितकेच महत्त्व श्रेष्ठ मुहूर्त आणि लग्न घटिकांचे असते.
आपल्या सनातन धर्मात देवशयनाच्या चातुर्मासात लग्नाच्या मुहूर्ताची मनाई आहे. जे देवोत्थान एकादशी पर्यंत चालू असतं.

शास्त्रानुसार या काळात लग्न करणे निषिद्ध मानले जाते, परंतु कधी-कधी देव उठणी एकादशी नंतर देखील बरेच लग्न मुहूर्त उपलब्ध नसतात. हा निव्वळ योगायोग असतो.

वर्ष 2020 मध्ये देखील असाच योग घडून येणार आहे. जेव्हा देव उठणी एकादशी नंतर देखील जवळ जवळ 3 महिने लग्न मुहूर्त उपलब्ध नसणार. पंचांगाच्या गणनेनुसार 15 डिसेंबर 2020 पासून 18 एप्रिल 2021 पर्यंत लग्नाचे मुहूर्त नसणार.
शास्त्रानुसार या काळात लग्न कार्य करण्यास मनाई असते. चला जाणून घेऊ या की देव उठणी एकादशीनंतर कोणत्या कारणास्तव लग्नाचे मुहूर्त निषिद्ध असणार.

1 धनू संक्रांती (मलमास/खरमास)- शास्त्रानुसार लग्नाचे मुहूर्त काढताना मलमासाची विशेष काळजी घेतली जाते. मलमासात लग्नाच्या मुहूर्ताचे अभाव असतात. 15 डिसेंबर 2020 पासून सूर्य धनू राशीत आल्यावर मलमास प्रारंभ होणार जे 14 जानेवारी 2021 पर्यंत प्रभावी असणार. म्हणून 15 डिसेंबर 2020 पासून ते 14 जानेवारी 2021पर्यंत मलमास असल्यामुळे या काळात लग्न कार्ये करण्यास मनाई आहे.
2 गुरू अस्तोदय - शास्त्रानुसार लग्नाच्या मुहूर्ताच्या निर्णयात गुरू-शुक्राचे उदित होणं आवश्यक आहे. गुरू-शुक्राच्या अस्त झाल्याने लग्नाचे मुहूर्त नसतात. येता 15 जानेवारी 2021पासून गुरू अस्त होणार आहे जो 13 फेब्रुवारी 2021 रोजी उदय होणार आहे. म्हणून या कालावधीत मुहूर्त नसल्यानं लग्न करण्यास मनाई आहे.

3 शुक्र अस्तोदय - शास्त्रानुसार लग्नाचा मुहूर्ताचा निर्णय घेताना गुरू- शुक्र उदित असणे आवश्यक मानले आहे. गुरू-शुक्र अस्त झाल्याचा स्थितीमध्ये लग्न कार्ये
करण्यास मनाई असते. 14 फेब्रुवारी 2021पासून शुक्र अस्त होणार जो 18 एप्रिल 2021 रोजी उदित होणार. म्हणून या कालावधीत देखील लग्न मुहूर्त नसल्याने लग्न कार्ये
होणार नाही. या काळात लग्न करण्यास मनाई आहे.यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

महाशिवरात्री : शिव मंत्र जपा, सुख-समृद्धी मिळवा

महाशिवरात्री : शिव मंत्र जपा, सुख-समृद्धी मिळवा
महाशिवरात्रीवर महादेवाची पूजा आराधना केली जाते. सुख, शांति, धन, समृद्धी, यश, प्रगती, ...

श्री गजानन विजय ग्रंथ बोधामृत

श्री गजानन विजय ग्रंथ बोधामृत
पहिल्या अध्यायी, सांगे गजानन अन्न पूर्णब्रह्म, ठेवा आठवण दुसऱ्या अध्यायी, सांगे ...

विजया एकादशी 2021 : मुहूर्त आणि विशेष गोष्टी जाणून घ्या

विजया एकादशी 2021 : मुहूर्त आणि विशेष गोष्टी जाणून घ्या
1. विजया एकादशी व्रत केल्याने अतिशय गंभीर आजरापासून देखील मुक्ती मिळते. 2. हे व्रत ...

दक्षिण काली म्हणजे काय आणि विशेष मंत्र कोणतं, जाणून घ्या

दक्षिण काली म्हणजे काय आणि विशेष मंत्र कोणतं, जाणून घ्या
माता कालिकेचे अनेक रूप आहेत ज्यापैकी प्रमुख आहे- 1. दक्षिणा काली, 2. शमशान काली, 3. ...

गजानन महाराज जळत्या पलंगावर बसून राहिले

गजानन महाराज जळत्या पलंगावर बसून राहिले
स्वामी भास्करासह आडगावात दत्त मंदिरात उतरले. भक्त मंडळींनी दर्शनास गर्दी केली. आडगावचे ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...