शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (14:59 IST)

संध्याकाळी या चार गोष्टी अजिबात करू नये, दारिद्र्य येते

संध्याकाळी अशी काही कामे आहेत ज्यांना चुकून देखील अजिबात करू नये. हे कार्य घरात दारिद्र घेऊन येतात. बऱ्याच वेळा आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला या चुका न करण्याचा सल्ला दिलेला असतो. पण आपण त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्षित करतो ज्याचा फटका आपल्याला सहन करावा लागतो. चला जाणून घेऊ या की असे कोणते काम आहे जे आपल्याला चुकून देखील करायचे नाही.
 
संध्याकाळी हे करू नये- 
ज्योतिष विज्ञानात झाडूचे उपाय सांगितले आहेत. त्याच वेळी वडीलधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दिवस सरता केर काढू नये. असे केल्याने घरातून चांगल्या गोष्टी देखील बाहेर निघून जातात आणि महालक्ष्मीची बहीण अलक्ष्मी घरात येते. म्हणून संध्याकाळच्या वेळी घरात कधीही झाडू लावू नये. 
 
आपण देखील हे करता का ?
वडीलधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार संध्याकाळच्या वेळी चुकून देखील एखाद्या स्त्रीचा अपमान करू नये आणि या गोष्टी वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही जागी लक्षात ठेवाव्यात. असं म्हणतात की या वेळी स्त्रीचा अपमान केल्यानं देवी लक्ष्मी नेहमीसाठी रुसून जाते आणि व्यक्ती दरिद्री होतो.
 
संध्याकाळच्या वेळी हे काम करणं चुकीचे आहे-
वडीलधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार संध्याकाळच्या वेळी कधीही झोपू नये. असं म्हणतात की जे लोक संध्याकाळच्या वेळी झोपतात त्यांच्याकडे लक्ष्मी देवी कधीही वास्तव्यास नसते. म्हणून चुकून देखील संध्याकाळी घरात झोपू नये.
 
तुळशीला पाणी घालू नये- 
संध्याकाळच्या वेळी तुळशीला पाणी घालू नये आणि त्याचे पान देखील तोडू नये. असं केल्यानं घरातून लक्ष्मी कायमची निघून जाते आणि खूप प्रयत्न केल्यावर देखील पैसे मिळवता येत नाही.