शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 7 नोव्हेंबर 2020 (13:04 IST)

8 नोव्हेंबर 2020 रवि पुष्य नक्षत्र : धन संपदा आणि समृद्धीसाठी 10 उपयुक्त गोष्टी जाणून घ्या

मत मतांतराने पुष्य नक्षत्र यंदाच्या वर्षी दोन दिवस येत आहे. बहुतेक लोक याला शनि पुष्य नक्षत्र म्हणून शनिवार 7 नोव्हेंबर रोजी साजरा करणार आहे आणि काही लोक 8 नोव्हेंबर रविवारी रोजी आहे असे मानत आहे. जाणून घेऊ या रवि पुष्य नक्षत्रात केले जाणारे 10 कामांबद्दल.
 
1 रवि पुष्य नक्षत्राला सोनं, चांदी किंवा पितळ्याने बनलेल्या वस्तू विकत घेतल्याने घरात समृद्धी राहते.
 
2 रवि पुष्य नक्षत्राच्या दिवशी जमीन, घर आणि वाहने खरेदी करणं शुभ मानतात.
 
3 या दिवशी दक्षिणावर्ती शंख आपल्या दुकानात ठेवल्यानं व्यवसायात वाढ होते.
 
4 रवि पुष्य नक्षत्राच्या दिवशी चांदीचा एक चौरस तुकडा विकत आणून त्याची पूजा केल्यानं आर्थिक संकट दूर होते.
 
5 रवि पुष्य नक्षत्राच्या दिवशी भगवान विष्णुसह आई लक्ष्मीची पूजा केल्यानं आणि श्रीयंत्र विकत घेतल्यानं समृद्धी येते.
 
6 रवि पुष्य नक्षत्राच्या दिवशी लहान मुलांची मुंज आणि त्यांची शिक्षण घेण्यासाठी गुरुकुलात पाठवणी केली पाहिजे.
 
7 रवि पुष्य नक्षत्राच्या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणं चांगले मानले गेले आहेत.
 
8 रवि पुष्य नक्षत्राच्या दिवशी तंत्र मंत्र सिद्धी केल्यानं यश प्राप्ती होते.
 
9 रवि पुष्य नक्षत्राच्या दिवशी गायीला गूळ खाऊ घातल्यानं आर्थिक फायदा होतो.
 
10 एखाद्याच्या जन्म कुंडलीत सूर्य दोष असल्यास तर रवि पुष्य नक्षत्रचा दिवस सूर्यदोषच्या दुष्परिणामाला दूर करण्यासाठी उत्तम मानला आहे. या दिवशी गोड पाणी सूर्याला अर्पण करावं. दूध भाताचे सेवन करावे.