मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (10:59 IST)

कार्तिक महिन्यात काय करावे आणि काय नाही

कार्तिक महिना हा एक पावित्र्य महिना आहे. या महिन्यात सर्व देवी-देवांना एकत्ररीत्या प्रसन्न केले जाऊ शकतं. शरद पौर्णिमेच्या नंतर कार्तिक महिना खूप पावित्र्य मानला आहे. 
 
पौर्णिमा ही लक्ष्मीला फार आवडते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात आनंद मिळतो. 
 
पौर्णिमेच्या दिवशी आई लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर राहते. पौर्णिमेच्या दिवशी जो कोणी गोड दूध पिंपळाच्या झाडावर अर्पण करतो त्याचा वर आई लक्ष्मी नेहमीच आनंदी होते. 
 
कार्तिक महिन्यात गरिबांना तांदूळ दिल्यानं चंद्र ग्रह शुभ परिणाम देतात.
 
त्याच प्रमाणे या महिन्यात शिवलिंगावर कच्च दूध, मध आणि गंगाजल मिसळून अर्पण केल्यानं भगवान शिव प्रसन्न होतात.
 
कार्तिक महिन्याचा मुख्य सणाच्या दिवशी घराच्या मुख्यदारावर आंब्याच्या पानाचे तोरण बांधा. 
 
कार्तिक महिन्यात विवाहित व्यक्तीने शारीरिक संबंध ठेवू नये. अन्यथा चंद्राचे दुष्परिणाम आपल्याला त्रास देऊ शकतात. या महिन्यात आपल्या पत्नीला आणि लहान मुलीला काहीतरी भेटवस्तू द्यावी.
 
कार्तिक महिन्यात संपूर्ण महिना दारावर रांगोळी आवर्जून काढा. या मुळे विशेष समृद्धीचे योग बनतात आणि नवग्रह देखील प्रसन्न होतात.