गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (15:32 IST)

भुलाबाई गाणी 2020

भुलाबाई भुलाबाई यंदा च वर्ष काय काय करायचं सांगू का सांगू का!
भुलाबाई भुलाबाई यंदा चे वर्ष, बाहेर जाणं टाळू या टाळू या ! 
 
भुलाबाई भुलाबाई यंदा च वर्ष काय काय करायचं सांगू का सांगू का!
भुलाबाई भुलाबाई यंदाचं वर्षी मास्क तो बांधू या बांधू या!
 
भुलाबाई भुलाबाई यंदा च वर्ष काय काय करायचं सांगू का सांगू का!
भुलाबाई भुलाबाई यंदा च्या वर्षी पाहुण्यांना नको नको म्हणू या म्हणू या !
 
भुलाबाई भुलाबाई यंदा च वर्षी काय काय करायचं सांगू का सांगू का!
भुलाबाई भुलाबाई यंदा चे वर्षी लग्न-समारंभ टाळू या टाळू या!
 
भुलाबाई भुलाबाई यंदा चं वर्ष काय काय करायचं सांगू का सांगू का!
भुलाबाई भुलाबाई यंदा चे वर्षी सहली ला जाणं विसरू या विसरू या!
 
भुलाबाई भुलाबाई यंदा चे वर्षी काय काय करायचं सांगू का सांगू का!
भुलाबाई भुलाबाई यंदा चे वर्षी बाहेरचं खाणे बंद करू या बंद करू या!
 
भुलाबाई भुलाबाई यंदा चे वर्षी काय काय करायचे सांगू का सांगू का!
भुलाबाई भुलाबाई यंदा चे वर्षी "बाई" बंद करू या करू या!
 
भुलाबाई भुलाबाई यंदा चे वर्षी काय काय करायचं सांगू का सांगू का!
भुलाबाई भुलाबाई यंदा चे वर्षी घरातच सण साजरे करू या करू या !
 
भुलाबाई भुलाबाई यंदा चे वर्षी काय काय करायचे सांगू का सांगू का!
भुलाबाई भुलाबाई यंदा चे वर्षी कोरोना ला पळवू या पळवू या ! 
 
भुलाबाई भुलाबाई यंदा चे वर्षी "हे"सगळं कराल ना कराल ना?
 
.... अश्विनी थत्ते .....
        नागपूर