शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Modified: शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (09:27 IST)

करवा चौथ मुहूर्त : कधी आहे चतुर्थी, शुभ मुहूर्त, मंत्र, चंद्रोदय आणि पूजेची पद्धत

सवाष्णीचा सुंदर सौभाग्याचा सण करवा चौथ यंदाच्या वर्षी 4 नोव्हेंबर 2020 रोजी साजरा करण्यात येत आहे.
 
* या दिवशी बायका निर्जला उपवास ठेवतात आणि रात्री चंद्रमाला बघूनच आपले उपवास सोडतात.
 
* या दिवशी जर सवाष्ण बायका उपवास करतात तर त्यांचा नवऱ्याचे आयुष्य दीर्घ होतं आणि त्यांच वैवाहिक जीवन आनंदी होतं.
 
* हे उपवास सूर्योदयापूर्वी सुरू होऊन चंद्रोदय पर्यंत धरतात.
 
* या उपवासात सासू आपल्या सुनेला सरगी देते. ही सरगी घेऊन सुना आपल्या उपवासाला सुरू करतात.
 
* या उपवासात संध्याकाळच्या वेळी शुभ मुहूर्तात चंद्रोदयाच्या पूर्वी भगवान शिवच्या संपूर्ण कुटुंबाची पूजा करतात.
 
* चंद्रोदयानंतर बायका चंद्रमाला अर्घ्य देतात आणि आपल्या पतीच्या हातून पाणी पिऊन उपवासाला पूर्ण करतात. हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्याच्या कृष्णपक्षात चतुर्थी तिथीला करवा चौथ किंवा चतुर्थी साजरा करतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी यश -कीर्ती, सौभाग्य वाढण्यासाठी या उपवासाला अतिशय फलदायी मानतात.
 
करवा (चौथ) चतुर्थीचे शुभ मुहूर्त - 
4 नोव्हेंबर 2020, बुधवार - 
संध्याकाळी 5 वाजून 34 मिनिटांपासून 6 वाजून 52 मिनिटापर्यंत. 
करवा चौथच्या संध्याकाळच्या पूजेचे शुभ मुहूर्त आहे. 
या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटाला होणार.

करवा चौथ उपवासाची पूजा विधी - 
* सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी सगळ्यांनी उठावे. सरगीच्या रूपात मिळालेले अन्न ग्रहण करावे पाणी प्यावं आणि देवांची पूजा करून पाणी पिऊन निर्जला उपवासाचे संकल्प घ्यावे.
 
* या दिवशी बायका संपूर्ण दिवस अन्न-जल काहीच ग्रहण करत नाही. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर दर्शन करूनच उपवास खोलतात.
 
* पूजेसाठी संध्याकाळच्या वेळी एका मातीच्या वेदीवर सर्व देव स्थापित करून या मध्ये करवे (मातीचा तांब्या) ठेवावे.
 
* एका ताटलीत धूप, दिवा, चंदन, रोली, शेंदूर, ठेवून तुपाचा दिवा लावावा.
 
* पूजा चंद्रोदयाच्या किमान 1 तासापूर्वीच सुरू करावी. या दिवशी सर्व बायका मिळून एकत्ररित्या पूजा करतात.
 
* पूजेच्या वेळी करवा चौथची गोष्ट आवर्जून ऐकावी किंवा सांगावी.
 
* चंद्रमाला चाळणीने बघून अर्घ्य देऊन चंद्रमाची पूजा करावी.
 
* चंद्राला बघून पतीच्या हातून पाणी पिऊन उपवास सोडतात.
 
* या दिवशी सुना आपल्या सासूला एका ताटात मिठाई, फळ, सुकेमेवे, रुपये देऊन त्यांच्या कडून सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद मिळवतात.
 
चंद्राला अर्घ्य देताना म्हणावयाचे मंत्र -
करकं क्षीरसंपूर्णा तोयपूर्णमयापि वा। ददामि रत्नसंयुक्तं चिरंजीवतु मे पतिः॥
इति मन्त्रेण करकान्प्रदद्याद्विजसत्तमे। सुवासिनीभ्यो दद्याच्च आदद्यात्ताभ्य एववा।।
एवं व्रतंया कुरूते नारी सौभाग्य काम्यया। सौभाग्यं पुत्रपौत्रादि लभते सुस्थिरां श्रियम्।।