रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. मराठी कलावंत
Written By
Last Modified: सोमवार, 27 मार्च 2023 (14:30 IST)

मराठीतील सुपरस्टार अशोक सराफ यांचा चित्रपट प्रवास वाचा पूर्ण रिपोर्ट

मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. त्यासोबत त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. नुकतंच अशोक सराफ यांना ‘झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा’च्या जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.तर मग जाणून घेऊयात मराठी सुपरस्टार अशोक सराफ यांच्या बद्दल पूर्ण माहिती.
 
अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील हम पांच सारख्या मालिकेमध्येही त्यांनी अभिनय केला. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे एक मराठी सुपरस्टार आहेत. सिने अभिनेत्री निवेदिता जोशी ह्या सराफांच्या पत्नी असून नाट्य‍अभिनेते रघुवीर नेवरेकर हे त्यांचे मामा होते.
 
त्यांनी अनेक चित्रपटात विनोदी भूमिका करण्याबरोबरच काही चित्रपटात खलनायकी तसेच विविध भूमिका तितक्याच ताकदीने व रसिकांच्या आयुष्यभर स्मरणात राहतील अशा साकारलेल्या आहेत. उत्कृष्ट अभिनय, सहज विनोद प्रवृत्ती, चेहऱ्यावरील कमालीचे हावभाव, विनोदाची अचूक वेळ, इत्यादी त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये होती. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे या अभिनेत्यांनी मराठी चित्रपटामध्ये फार मोठा काळ गाजवला आहे. चित्रपट क्षेत्रात सर्वांचे लाडके अशोकमामा या नावाने ते प्रसिद्ध आहेत.
 
मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला.दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ' ययाती आणि देवयानी ' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या.
 
अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि दमदार अभिनेता म्हणून अवघ्या हिंदुस्थानाला परिचीत आहे. मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर यांच्यासोबत त्यांनी मराठी विनोदी चित्रपटांची मालिकाच केली.
 
अशोक सराफ हे मुळचे बेळगाव या गावचे पण त्याचा जन्म मुंबईतील चिखलवाडी येथे झाला. त्यांचे बालपणही येथेच गेले. त्यांचे शिक्षण डी. जी. डी. या विद्यालयात झाले. अभिनयाची आवड असल्याने वयाच्या अठराव्या वर्षापासूनच अभिनयास सुरुवात केली. शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी या व्यावसायिक नाटकापासून त्यांनी रंगमंच्यावर प्रवेश केला. यानंतर दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार मधील इरसाल पोलीस, राम राम गंगाराम मधील म्हमद्या खाटिक यांसारख्या बहुरंगी भूमिका त्यांनी साकारल्या.
 
त्यांनी आपले कामाचे क्षेत्र मर्यादित न ठेवता त्यांनी विनोदी, खलनायक तसेच गंभीर पात्रेही पडद्यावर साकार केली आणि त्यातून आपली वेगळी शैली निर्माण केली. ऐंशीच्या दशकात अशोक आणि लक्ष्या या जोडीने रुपेरी पडद्यावर धमाल उडवून दिली. अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, दे दाणादाण यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी मराठी प्रेक्षक वर्गास पोटभरुन हसवले. अशोक सराफांच्या अभिनय उभारुन यायला दिग्दर्शक सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारेही तितकेच साथीदार आहेत. अशोक सराफांचे काही उल्लेखनिय चित्रपट नवरी मिळे नव-याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबा, एक उनाड दिवस, शुभमंगल सावधान, आई नंबर वन, आजही लोकांच्या मनात घर करुन आहेत.
 
 
पत्नी अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ बरोबर त्यांनी स्वत:ची निर्मिती संस्था चालू केलेली आहे. त्याद्वारे काही मालिकांची निर्मिती त्यांनी केली आहे. टिव्ही मालिकांमध्ये त्यांची सर्वात गाजलेली मालिका म्हणजे ’हम पांच’. अशोक सराफांनी चित्रपट संख्या कमी केलेली असली तरी प्रेक्षक अजूनही त्यांच्या नवीन चित्रपटांच्या प्रतिक्षेत असतात.
 
अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य- चित्रसृष्टीतील कामाद्वारे घडविले आहे. दादा कोंडकेंबरोबर पांडू हवालदार, कळत नकळत, भस्म यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा केली.
 
ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, दे दणा दण यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली.
 
अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या  शुभमंगल सावधान, आई नंबर वन व पहिली शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर अश्या असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले.
 
अनधिकृत या त्यांच्या रंगभूमीवरील पुनरारंभाच्या नाटकास योग्य प्रतिसाद मिळाला नाही. मनोमिलननंतर सध्या अशोक सराफ सारखं छातीत दुखतंय! हे विनोदी नाटक करीत आहेत. त्यांच्या सोबत पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्या सहकलाकार आहेत. पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्यांच्या सोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करून ‘टन टना टन’ व काही हिंदी मालिका बनवल्या.
 
हम पांच या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी दामाद या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. करण अर्जुन, कोयला, येस बॉस, जोडी नं.1 हे अशोक सराफ अभिनीत काही उल्लेखनीय चित्रपट.
 
मुुुख्यात्वे त्यानी सचिन पिळगांवकर,  लक्ष्मीकांत बेर्डे सारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांबरोबर काम केले. सचिन पिळगांवकर ह्यांच्या हृदयात अशोक मामांना खुप आदराचे स्थान आहे. आपल्या प्रत्येक सिनेमात अशोक मामांची भुमिका असावी हा त्यांचा लाडका हट्ट असतो आणि तो हट्ट अशोक मामा पूर्ण करतात. अशोक सराफ यांनी मराठी नाटकां तून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्या वडिलां चा इलेक्ट्रिक वस्तू आणण्याचा व विकण्याचा व्यवसाय होता.
 
अशोक सराफ यांनी बॅंकेत दहा वर्ष नोकरी केली पण प्रत्यक्षात ते नोकरीवर हजर कमी राहायचे आणि नाटकात जास्त काम करायचे. त्यांची पहिली फिल्मी भूमिका एका विदूषका ची होती. दादा साहेब कोंडके यांच्या पांडू हवालदार या चित्रपटात त्यांनी सखाराम हवालदार या भ्रष्ट हवालदाराच्या भूमिका साकारली. अशोक सराफ यांची अभिनयाची पद्धत ही सीच्युशनाल कॉमेडी स्वरूपाची आहे.
 
अशोक मामांची एक अनुभवी आणि वरिष्ठ कलाकार या नात्याने राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. जेणेकरून मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीसमोर असणारे प्रश्न संसदेत प्रभावीपणे मांडले जाऊ शकतात.
 
अशोक सराफ यांना मामा म्हणून ओळखले जाते :
70 च्या काळात कोल्हापूरला एका चित्रपटाचे शूट चालले होते आणि तिथला कॅमेरामन प्रकाश शिंदे होता. तो त्याच्या छोट्या मुलीला बरोबर घेऊन शूटींगला येत असे आणि त्या मुलीला त्याने हा अशोक मामा अशी ओळख करून दिली. थोड्याच दिवसात सेट वरील सर्वच लोक त्यांना मामा म्हणू लागले आणि हळूहळू हेच नाव त्यांना चिकटले आणि ते संपूर्ण इंडस्ट्रीचे मामा झाले.
 
मराठी चित्रपट :
आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच, आत्मविश्वास, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जंमत, भुताचा भाऊ, माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी, फेका फेकी, एक डाव भुताचा, एक डाव धोबीपछाड, आलटून पालटून, सगळीकडे बोंबाबोंब, साडे माडे तीन, कुंकू घनचक्कर, नवरा माझा नवसाचा चंगु मंगु, अफलातून, वाजवा रे वाजवा शुभ मंगल सावधान, जमलं हो जमलं, गोडीगुलाबी, गडबड घोटाळा, बाळाचे बाप ब्रम्हचारी, खुल्लम खुल्ला, धमाल नाम्याची, संसार, कळत नकळत, पैजेचा विडाबहुरूपीधूमधडाका, निशाणी डावा अंगठा, झुंज, टोपी वर टोपी.
 
हिंदी चित्रपट :
अशोक सराफ यांनी बॉलिवूडमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. सिंघम, प्यार किया तो डरना क्या, गुप्त, कोयला, येस बॉस आणि करण अर्जुन या सिनेमा मध्ये चांगल्या आणि लक्षात राहतील अशा भूमिका निभावल्या. गोविंदा, जॉनी लीव्हर, कादर खान यासारख्या शक्तिशाली कॉमेडी कलाकारांविरूद्धच्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले
 
पुरस्कार :
फिल्मफेअर पुरस्कार, महाराष्ट्र शासन पुरस्कार, महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कार, व झी गौरव पुरस्कारप्राप्त झालेले आहे.
1977 : राम राम गंगारामचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार.
एकूण 5 फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले.
पांडू हवालदार या चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार.
सवाई हवालदार या चित्रपटाचा स्क्रीन पुरस्कार
भोजपुरी फिल्म पुरस्कार माईका बिटुआ
मराठी चित्रपटांसाठी 10 राज्य सरकारचे पुरस्कार
महाराष्ट्रेचा आवडता कोन? मधील सर्वोत्कृष्ट कॉमेडियन.
 
Edited By- Edited By - Ratnadeep ranshoor