1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
  4. bermuda triangle mystery solved

बर्म्युडा ट्रँगलमध्ये कसलेही रहस्य नाही

बर्म्युडा ट्रँगलमध्ये कसलेही रहस्य नाही
सिडनी- गेल्या कित्येक वर्षांपासून जगभरातील सर्वाधिक रहस्यमय ठिकाणांच्या यादीत नेहमीच बर्म्युडा ट्रँगलचे नाव वरच्या क्रमांकावर राहिले आहे. गेली 70 वर्षे या त्रिकोणीय सागरी परिसरात अनेक जहाजे आणि विमाने गायब झाली आहेत. मात्र तरीही एका ऑस्ट्रेलियन संशोधकाने आता या परिसरात कोणतेही रहस्य नसल्याचे म्हटले आहे.

डॉ. कार्ल क्रूजेलनेकी असे या संशोधकाचे नाव. त्याने म्हटले आहे की बर्म्यडा ट्रँगलमध्ये गायब झालेल्या विमानांची संख्या ही जगातील अन्य कोणत्याही भागात गायब झालेल्या विमानांइतकीच आहे. परग्रहवासी किंवा बेपत्ता झालेल्या अटलांटिस शहराच्या फायर-क्रिस्टल वगैरेंशी त्याचा काही संबंध नाही.
पुढील लेख
AIIMS मध्ये 10वी पास लोकांसाठी वॅकेंसी, 40 हजार पगार