ओळखा बघू ..
1 एक असा डबा जो बोलतो आणि दाखवतो.
करतो हा करमणूक, घरात सगळ्यांचा असतो.
ओळखा बघू मी कोण ? (टेलिव्हिजन)
2 आहे मी बांबूची
असतात माझ्यात छिद्र
सूर मी छेडिते
सांगा माझे भेद. (बासरी )
3 फळ देतो, पाणी देतो,
देतो सगळ्यांना सावली.
इवल्याश्या गोष्टीने बनते.
हिरवेगार ह्याचे शरीर. (झाड)
4 वेळ ही सांगत असते,
स्वतः राहते स्थिर.
आवाज ही सतत करते .
दिवस रात्र ही चालत राहते. (घडी)
5 मी सतत फिरत राहतो पण मला पाय नाही.
रडतो पण मला डोळे नाही.
ओळखा बघू मी कोण? (ढग)
6 हिरवी पेटी काट्यात पडली,
उघडून बघता तर मोत्याने भरली.(भेंडी)