शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (12:05 IST)

'निळा ग्रह आपली पृथ्वी'

* पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. 
 
* पाणी असल्यामुळे आणि अंतराळातून निळी छटा आल्यामुळे याला निळा ग्रह असं ही म्हणतात.
 
* पृथ्वीचे वय सुमारे 4600,000,000 वर्ष आहेत. पृथ्वीचा एकुलता एक उपग्रह चंद्र आहे.
 
* पृथ्वी सौरमंडळातील असा ग्रह आहे, ज्यावर जीवन आहे आणि इथे पाणी तिन्ही अवस्थेत ठोस, द्रव्य आणि गॅस आहे.
 
* पृथ्वी आपल्या अक्ष भोवती सुमारे 23 तास, 56 मिनिटे आणि 4 सेकंदात एक फेरी पूर्ण करते, या मुळे दिवस रात्र होतात.
 
* सूर्यापासून पृथ्वी पर्यंत प्रकाश पोहोचण्यात 8 मिनिटे 18 सेकंद लागतात.
 
* पृथ्वी एकमेव घर आहात ज्यांचे नाव ग्रीक किंवा रोमन देवाच्या नावावर ठेवले नाही. बृहस्पती ग्रहाचे नाव रोमन देवांचे राजा आणि युरेनस ग्रहाचे नाव ग्रीक देवांच्या नावावर ठेवले आहे. 
 
* पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरताना सूर्याभोवती देखील प्रदक्षिणा घालते याला 'वार्षिक गती 'म्हणतात. 
 
* पृथ्वीच्या वायुमंडळात 21 टक्के ऑक्सिजन म्हणजेच प्राण वायु आहेत आणि तळावर पाणी आहे.
 
* पृथ्वी आपल्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. याला पृथ्वीची दैनिक गती म्हणतात.
 
* पृथ्वीच्या या दैनिक गतीमुळे दिवस आणि रात्र होतात आणि वार्षिक गतीमुळे हंगामे बदलतात.
 
* पृथ्वीची उत्पत्ती 4.6 अरब वर्षांपूर्वी झाली असे, याचे 70.8 टक्के भाग पाणी आणि 29.2 टक्के भाग स्थलीय आहे.
 
* पृथ्वी सौरमंडळाचे एकमेव ग्रह आहे याचा खाली टेक्टॉनिक प्लेट्स आहे. हे प्लेट्स पृथ्वीच्या खाली मॅग्मा वर तरंगत आहे. हे प्लेट्स आपसात घर्षण केल्यावर कंपन होत. ज्याला भूकंप म्हणतात.
 
* आपण कधी विचार केला आहे की पृथ्वीवर प्रत्येक चार वर्षातून एक लीप वर्ष का असतं? असं या मुळे कारण पृथ्वीवर एक वर्ष 365 दिवसाचे नसून 365.2564 दिवसाचे असत हे अतिरिक्त 0.2564 दिवस दर चार वर्षात फेब्रुवारी च्या महिन्यात एक अतिरिक्त दिवस(लीप दिन) सह जुळून जातं.