सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जून 2021 (09:00 IST)

फेब्रुवारी महिन्यात 28 किंवा 29 दिवसच का असतात?

आपल्या सर्वांना माहित आहे की वर्षामध्ये 12 महिने असतात आणि प्रत्येक महिन्यात 30 किंवा 31 दिवस असतात.परंतु वर्षात एक असा महिना देखील आहे ज्यात 30 किंवा 31 दिवस नसून 28 किंवा 29 दिवस असतात.आपण विचार केला आहे असं का? चला तर मग जाणून घ्या.
 
याचे कारण असे की आपण सध्या वापरत आहोत ते केलेंडर रोमन केलेंडर वर आधारित आहे. जुन्या रोमन केलेंडर मध्ये महिना मार्च पासून सुरु आहे.त्यामुळे संपूर्ण वर्षाचे एकूण 304 दिवस होते.आणि वर्षात 10 महिने होते.नंतर या केलेंडरमध्ये बरीच सुधारणा करण्यात आली.त्यात जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोन महिने जोडण्यात आले.वर्षाचे 12 महिने झाले आणि 355 दिवस झाले.परंतु हे केलेंडर देखील योग्य नसल्याने त्यात काही सणवार योग्य वेळी आलेच नाही त्यामुळे या केलेंडर मध्ये अजून सुधारणा करण्यात आली. या केलेंडर मध्ये सणवार त्याच तारखेला यावे या साठी या केलेंडर मधून फेब्रुवारीच्या 
महिन्यातून दोन दिवस कमी करण्यात आले.त्यामुळे वर्षाचे 365 दिवस झाले.हे केलेंडर सूर्य आणि पृथ्वीच्या कक्षानुसार तयार केले कारण पृथ्वीला सूर्याच्या भोवती संपूर्ण भ्रमण करायला 365 दिवस आणि 6 तास लागतात.आणि प्रत्येक वर्षात 6 तास शिल्कक राहतात. हेच 6 तास प्रत्येक 4 वर्षानंतर 24 तास म्हणजे एक दिवस बनवतो. हा दिवस फेब्रुवारी महिन्यात जोडण्यात आला.या कारणास्तव फेब्रुवारी महिन्यात 28 किंवा 29 दिवस असतात.