शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

हिरवा चारा खाणारी गाय पांढरं दूध कसं काय देते !

दूध म्हणजे संपूर्ण आहार. दुधात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळतं यासह व्हिटॅमिन डी चे प्रमाणही आढळतं ज्याने हाडं मजबूत होतात.
 
आता प्रश्न हा आहे की दूध पांढरं कसं? दुधाला पांढरेपणा कॅसिइन नामक प्रोटीनमुळे मिळतं. हे प्रोटीन कॅल्शियमसोबत दुधाला पांढरं करतं. दुधात आढळणार्‍या चरबी पांढर्‍या रंगाची असते. हेच कारण आहे की दुधात जितक्या प्रमाणात चरबी आणि चिकनाई असते तेवढंच ते दूध शुभ्र पांढरं असतं जेव्हाकि कमी वसा किंवा क्रीम आढळणार्‍या दुधाचा रंग ऑफ व्हाईट असा असतो.
 
चरबीच्या अधिकतेमुळे म्हशीचे दूध गायीच्या दुधाच्या तुलनेत अधिक पांढरं असतं. याव्यतिरिक्त एक आणखी कारण म्हणजे काही वस्तू प्रकाश पूर्णपणे अवशोषित करत नसतात. असेच कॅसिइनचे अणूदेखील करतात. ते प्रकाश अवशोषित करत नसल्यामुळे दुधाचा रंग पांढरा दिसतो.