सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

खरंच दूध ‍पितो का नाग?

प्रत्येक हिंदू नागपंचमीच्या दिवशी नाग देवाची पूजा-अर्चना करतो. अनेक लोकांचा अंधविश्वास आहे की नागाला दूध पाजण्याने नाग देव प्रसन्न होतात. परंतू हा गैरसमज आहे कारण नाग कधीच दूध पीत नाही. दूध हे सापाचे नैसर्गिक अन्न नाही. नाग दूधच काय कोणताही पेय पदार्थ पीत नाही. चुकीने दूध प्यायला तर त्याची मृत्यू होऊ शकते. मग अशात पूजा काय कामाची? अशाने फल मिळण्याऐवजी मृत्यूचा दोष लागू शकतो. 
 
नागपंचमीला कसे प्रसन्न होतील नागदेव
कोळशाने घराच्या उंबरठ्यावर नाग देव अधोरेखित करण्याची परंपरा आहे. गायीच्या शुद्ध तुपाने नाग बनवून त्याची पूजा केल्यानेही पुण्य लागतं.
ज्याच्या पत्रिकेत कालसर्प योग असेल त्याने नागपंचमीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर जाऊन कालसर्प दोषाची पूजा करवावी. तुपाचा नाग बनवून पूजा केल्याने दोष कमी होतात.
 
पूजेत पुष्प, कुंकू, अक्षता इत्यादी घेऊन तुपाने बनवलेल्या नागाची पूजा करून डाळ-बाटी, लाडू-चूरम्याचा नैवेद्य दाखवावा आणि मनापासून प्रार्थना करावी- 'हे नाग देवता! माझ्या जन्माच्या वेळी असलेले अशुभ योग दूर करून शुभता प्रदान करा आणि माझ्या कार्यांमध्ये येत असलेले अडथळे दूर करा. माझ्या कार्यांमध्ये यश मिळू द्या.
 
या प्रकारे पूजा-अर्चना केल्याने अवश्य लाभ प्राप्ती होईल.