गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (16:40 IST)

World Radio Day 2023: जागतिक रेडिओ दिवस केवळ 13 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो ? माहिती जाणून घ्या

आज जागतिक रेडिओ दिवस. जागतिक रेडिओ दिवस दरवर्षी 13 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिवशी दरवर्षी युनेस्को जगातील सर्व प्रसारक, संस्था आणि समुदायांच्या सहकार्याने विविध कार्यक्रम आयोजित केले जाते. संवादाचे माध्यम म्हणून रेडिओच्या भूमिकेवर चर्चा करून लोकांना त्याबद्दल जागरूक केले जाते. रेडिओ ही जगभरातील माहितीची देवाणघेवाण करणारी सेवा आहे. आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीत रेडिओचे महत्त्व वाढते. अशा परिस्थितीत जगभरातील तरुणांना रेडिओची गरज आणि महत्त्वाची जाणीव करून देणे हा जागतिक रेडिओ दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. माहितीचा प्रसार करण्यासाठी रेडिओ हे सर्वात शक्तिशाली आणि स्वस्त माध्यम म्हणून ओळखले जाते. रेडिओ हे युगानुयुगे असले तरी त्याचा वापर संवादासाठी केला जात आहे. जागतिक रेडिओ दिवस कधी आणि का सुरू झाला चला तर मग जाणून घेऊ या.
 
2011 साली जागतिक रेडिओ दिनाची सुरुवात झाली. 2010 मध्ये, स्पॅनिश रेडिओ अकादमीने प्रथमच 13 फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. 2011 मध्ये, युनेस्कोच्या सदस्य देशांनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि 13 फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिवस म्हणून घोषित केला. नंतर 2012 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनेही ते स्वीकारले. त्यानंतर त्याच वर्षी 13 फेब्रुवारी रोजी युनेस्कोने प्रथमच जागतिक रेडिओ दिवस साजरा केला.
 
13 फेब्रुवारीलाच जागतिक रेडिओ दिन साजरा करण्याचे एक खास कारण आहे. वास्तविक, संयुक्त राष्ट्र रेडिओ 13 फेब्रुवारी 1946 रोजी सुरू झाला. संयुक्त राष्ट्र रेडिओच्या वर्धापनदिनानिमित्त जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जाऊ लागला.
 
जागतिक रेडिओ दिन 2022 ची थीम ''एवोलूशन - द वर्ल्ड इज ऑलवेज चेंजिंग' आहे. म्हणजेच विकासाबरोबर जगाचाही विकास होत आहे. थीम रेडिओची लवचिकता आणि टिकाऊपणा दर्शवते. याचा अर्थ जग जसजसे बदलत आहे, तसे रेडिओमध्येही नावीन्यता येत आहे. तरी आजही तो काळ आठवतो जेव्हा आपण रेडिओ पाहून आनंदी व्हायचो.
''जागतिक रेडिओ दिनाच्या शुभेच्छा''