गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (08:21 IST)

Wednesday Remedies बुधवारी करा ज्योषिताचे 5 उपाय

ganapati
जुनी मान्यता आहे की बुधवार हा गणपतीच्या पूजेचा विशेष दिवस आहे. तसेच या दिवशी बुध ग्रहाची पूजा केली जाते. जर व्यक्तीच्या पत्रिकेत बुध ग्रह अशुभ स्थितीत असेल तर बुधवारी येथे दिलेले उपाय केल्याने नक्कीच फायदा होईल...
1. बुधवारी सकाळी स्नानादी करून गणपतीच्या देवळात जाऊन दूर्वा अर्पित कराव्या. दूर्वांची 11 किंवा 21 जोडी अर्पित करायला पाहिजे.  
2. गायीला हिरवं गवत खाऊ घाला. शास्त्रानुसार गायीला पूजनीय आणि पवित्र मानण्यात आले आहे. गोमाताची सेवा करणार्‍या व्यक्तीवर ईश्वराची सदैव कृपा असते.   
3. एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात हिरव्या मुगाचे दान करा. मूग हे बुध ग्रहाशी संबंधित धान्य आहे. याचे दान केल्याने बुध ग्रहाचे दोष शांत होतात.  
4. सर्वात लहान बोटात पाचू (पन्ना) रत्न धारण केले पाहिजे. पन्ना धारण करण्या अगोदर एखाद्या ज्योतिषीला आपली पत्रिका जरूर दाखवून द्यायला पाहिजे.    
5. गणपतीला मोदकाचे नवैद्य दाखवायला पाहिजे.