बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑक्टोबर 2023 (21:56 IST)

Astro Tips : घराबाहेर पडताना काही सोपे उपाय करून चमत्कारी फल प्राप्त करा

garah nakshatra
प्रत्येक दिवस शुभ असतो, परंतू आपले ग्रह त्याच्या अनुकूल नसतील तर विपरित परिणाम समोर येतात. जर आपण ही ग्रहांच्या अशुभ योगामुळे त्रस्त असाल, आपल्या कामात अडथळे येत असतील तर हे काही सोपे उपाय करून आपण चमत्कारी फल ‍प्राप्त करू शकता. हे उपाय केल्याने आपला प्रत्येक दिवस अनुकूल घडेल.
 
रविवारी स्वत:जवळ पान ठेवा.
सोमवारी बाहेर पडताना आरशात आपला चेहरा बघून निघा.
मंगळवारी मिठाई खाऊन निघा.
बुधवारी कोथिंबीरची पाने खाऊन बाहेर पडा.
गुरूवारी सरसोचे दाणे तोंडात टाकून निघा.
शुक्रवारी दही खाउन प्रस्थान करा.
शनिवारी बाहेर पडण्याआधी आलं आणि तूप खाऊन जा.