शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (13:13 IST)

साथीचे आजार, दारिद्र्य दूर पळवण्यासाठी काही सोपे ज्योतिषी उपाय

लाल कपड्यात 5 वाळक्या लाल मिरच्या बांधून आपल्या बिछान्याखाली ठेवाव्या. दुसर्‍या दिवशी लाल मिरच्या वाहत्या पाण्यात प्रवाहित कराव्या. असे केल्याने आरोग्य चांगलं राहतं आणि कोणतीही साथीचा रोग लागण्याची शक्यता कमी होते.
 
आपलं भाग्य उजळविण्यासाठी एक लिंबू घेऊन त्याला स्वत:वरून सात वेळा ओवाळून त्याचे दोन तुकडे करावे. उजव्या हातातील तुकडा डाव्या बाजूला आणि डाव्या हातातील तुकडा उजव्या बाजूला फेकावा. असे केल्याने अडथळे येत असलेले कामं सुरळीत होतील आणि अडकलेला पैसा परत मिळेल.
 
विवाह ठरण्यात अडचण येत असल्यास चण्याच्या डाळीत गूळ मिसळून गायीला खाऊ घालावं. 11 गुरुवारी हा उपाय केल्याने मनोकामना पूर्ण होईल. प्रत्येक शनिवारी एका नारळ स्वत:वरून 11 वेळा ओवाळून वाहत्या पाण्यात प्रवाहित करावं. हा उपायाने कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर संकट येण्याची शक्यता नाहीशी होते आणि आपले ग्रह शांत होतात.
 
पोळी बनवण्याआधी तव्यावर दुधाचे काही थेंब टाकावे. याने घरातील आजार दूर होतात आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य लाभ मिळतो.
 
घरात कलह होत असल्यास रात्री पलंगाखाली पाण्याच्या ग्लासात तुरटीचे काही तुकडे घालून ठेवावे आणि दुसर्‍या दिवशी पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे. घरातील वाद मिटतील. कुटुंबात प्रेम वाढेल. असे किमान एक महिन्यापर्यंत करावे.
 
कुटुंबातील सुखासाठी घरातील प्रमुख दरावर दररोज संध्याकाळी काळ्या मातीच्या दिव्यात तूप घालून दिवा लावावा. 
 
घरात वाद होत असल्यास स्वयंपाकघरात तुळस ठेवावी. फायदा होतो.
 
अमावास्या किंवा पौर्णिमाच्या दिवशी काळी मिरीचे दाणे ऊँ क्लीं बीज मंत्र जप करत कुटुंबाच्या सदस्यांवरून ओवाळून घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे फेेेेेेकावे. शत्रू शांत होतात. 
 
लाल रंगाच्या कागदावर आपली इच्छा लिहून त्याला रेशीम दोर्‍याने बांधून आपल्या पर्समध्ये ठेवावी. धनासंबंधी इच्छा पूर्ण होतात. पैशांची कमी भासत नाही.
 
टिप: हे उपाय आपल्या माहितीसाठी सांगण्‍यात आले आहेत. आपण कोणतेही उपाय करण्यापूर्वी ज्योतिषी सल्ला घेऊ शकता.