रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शनिवार, 18 मे 2019 (11:42 IST)

धनप्राप्तीचे अत्यंत सोपे उपाय नक्की करून बघा

वाचा आणि अमलात आणा धन प्राप्तीचे अत्यंत सोपे उपाय 
 
तसं तर जादू-टोणा शब्द नकारात्मक भाव मनात आणतात पण वास्तवात जुन्या काळापासून चालत आलेली भारतीय परंपरेत काही असे टोटके आहे जे फारच असरकारी असतात. ज्या टोटक्याच्या प्रयोगाने कुणालाही काही नुकसान होणार नसेल असे टोटक्यांचा प्रयोग करण्यात काहीच हरकत नसते. प्रत्येक व्यक्तीला धनाची इच्छा असते. धन प्राप्तीसाठी आणि त्याला वाढवण्यासाठी काही सोपे टोटके : 
 
जर कडक परिश्रमानंतर देखील तुमच्या व्यापारात वाढ होत नसेल आणि लक्ष्मी येते पण ती काही केल्या टिकत नसेल तर हा टोटका करून पाहा. 
एखाद्या गुरु पुष्य योग आणि शुभ चन्द्रमाच्या दिवशी सकाळी हिरव्या रंगाच्या कपड्याची लहान पिशवी तयार करा. गणपतीचे फोटो किंवा मूर्तीसमोर 'संकटनाशन गणेश स्तोत्र'चे 11 पाठ करा. नंतर या पिशवीत 7 मूग, 10 ग्रॅम साबूत धणे, एक पंचमुखी रुद्राक्ष, एक चांदीचा नाणं किंवा 2 सुपार्‍या, 2 हळकुंड ठेवून उजवी सोंड असलेल्या गणपतीला साजुक तुपाचे मोदक प्रसाद म्हणून लावावे. नंतर ही पिशवी तिजोरी किंवा कॅश बॉक्समध्ये ठेवावी. आर्थिक परिस्थितीत लवकरच सुधार येईल. 1 वर्षानंतर नवीन पिशवी बनवून बदलू शकता. 
 
जर तुम्हाला अपार धन-संपत्ती मिळवायची असेल तर, लाल रंगाचा मातीचा माठ घेऊन त्याचा तोंडावर दोरी (मोली) बांधून त्यावर नारळ ठेवून वाहत्या पाण्यात प्रवाहित केले पाहिजे. 
 
अडकलेले आर्थिक कार्यांच्या सिद्धीसाठी हा टोटका फारच लाभकारी आहे 
कुठल्याही गणेश चतुर्थीला गणपतीचे उजव्या सोंडांचे चित्र घर किंवा दुकानात लावावे. त्याची पूजा करावी. त्यांच्यापुढे लवंग व सुपारी ठेवावी. जेव्हा कधी तुम्ही कामावर जात असाल तर या लवंग आणि सुपारीला सोबत घेऊन गेल्याने तुमचे कार्य नक्कीच पूर्ण होतील. रोज एक लवंग आणि सुपारी आपल्या जवळ ठेवायला पाहिजे. कामावर जाण्याअगोदर लवंग चोखायला पाहिजे व सुपारीला परत गणपतीजवळ आणून ठेवावी व निघताना 'जय गणेश दूर कर क्लेश' असे म्हणावे. 
 
कुठल्याही आर्थिक कार्यात वारंवार अपयश मिळत असेल तर हा टोटका करा 
सरसोच्या तेलात भाजलेली कणीक व जुन्या गुळापासून तयार केलेल्या सात पुर्‍या, सात आकड्याचे फूल, सिंदूर, पिठापासून तयार सरसोच्या तेलाचा दिवा, पत्रावळ किंवा अरेंडीच्या पानावर सर्व सामग्री ठेवून शनिवारी रात्री एखाद्या चौरस्त्यावर ठेवून म्हणावे -'मी माझे दुर्भाग्य येथेच सोडून जात आहे आता कृपाकरून माझा पाठलाग करू नको' असे म्हणत पुढे जायला पाहिजे मागे वळून बघायचे नाही.