गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2019
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2019 (16:38 IST)

साप्ताहिक राशीफल 5 ते 11 मे 2019

मेष : तुमच्या पानावर या काळात अधिक समस्या वाढून ठेवल्या आहेत. विचारपूर्वक निर्णय घेतल्याने त्याच्यावर मात करता येईल. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल. कुटूंबातील मतभेद दूर होतील. व्यापार- व्यवसायात नवीन योजना पूर्ण करू शकाल. आत्मविश्वासाने वाटचाल करत रहा. प्रवास योग आहे.
 
वृषभ : मानसिक समाधान न मिळल्याने दु:खी रहाल. लहान लहान गोष्टी मनाला बोचतील. त्याकडे फारसे लक्ष न दिलेलेच बरे. आर्थिक योग साधारण रहील. काम वेळवर पूर्ण करावे लागतील. कोणावर विश्वास ठेवू नका, नुकसान संभवते. विरोधकांचा अंदाज घ्यावा लागेल. विनाकारण कॅबिनमध्ये बॉस समोर उभे रहावे लागेल. संयमाने वागा.
 
मिथुन : नोकरी- व्यवसायात प्रामाणिक रहावे लागेल. संधीचा उपयोग करून घ्यावा लागेल. मित्रमंडळींकडून सहकार्य मिळत राहील. व्यवहार सांभाळून करा. कोणावरही विसंबून राहू नका. आर्थिक योग मध्यम राहील. खर्चाचे नियोजन करावे लागेल.
 
कर्क : आशातीत सुधारणा जाणवतील. आत्मविश्वास वाढेल. नोकरी-व्यवसायात भरभराटी येईल. कामात मन लागेल. अनुभव व कार्यक्षमता यांची योग्य सांगड घालणे शक्य होईल. चांगल्या संधी येतील. न्याय प्रविष्ठ कामात यश मिळले. अचानक लाभ होईल. कुटुंबात शुभ कार्य होतील.
 
सिंह : कामकाजाचा अतिरिक्त ताण राहील. जबाबदार्‍या वाढतील. व्यापार- व्यवहारात लाभ मिळेल. संधीचा वेळेनुसार उपयोग करून घ्या. परिश्रमाचे चीज होईल. अपेक्षीत यश मिळेल. नोकरी- व्यवसायात लाभ मिळेल. आर्थिक योग उत्तम आहे. मनाप्रमाणे खर्च करता येईल.
 
कन्या : प्रयत्नांना यश येईल. नवीन योजना क्रियान्वयन करू शकाल. वैयक्तिक पातळीवर निर्णय घ्यावे लागतील. नोकरीत समाधान मिळेल. जुन्या समस्या हळूच डोकेवर काढतील परंतु  गुरूचे पाठबळ असल्याने त्यांच्यावर वेळीच तोडगा निघेल. आर्थिक योग उत्तम. कुटुंबातील मतभेद दूर होतील. मित्रमंडळीकडून अपेक्षीत सहकार्य मिळेल.
 
तूळ : विशेष अनुकूल काळ. आरोग्याच्या अडचणी दूर होतील. विरोधक शांत बसतील. मानसिक थकवा जाणवणार नाही. अनुभवाचा चांगला वापर करता येईल. कुटूंबात उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीच्या संधी येतील. प्रवास योग संभवतो.
 
वृश्चिक : कामात निश्चिंतता राहील. आत्मविश्वास वाढवावा लागेल. कामात नियमितता ठेवावी लागेल. अनुभवाचा फायदा करून घ्यावा. विरोधकांचा अंदाज घ्यावा लागेल. आर्थिक योग उत्तम राहील. नोकरीत वरिष्ठांकडून उचित सहकार्य लाभेल. प्रवास योग संभवतो. 
 
धनू : उत्साह देणारा काळ राहिल. परिस्थितीचा अभ्यास करूनच पुढे पाऊल टाका. मनातील इच्छा पूर्ण होतील. अनुभवाचा फायदा होईल. व्यापार, व्यवसायातील आवक साधारण राहिल. खर्च वाढेल. प्रॉपर्टी, खरेदी, विक्रीचे व्यवहार करताना सावध रहा.
 
मकर : विरोधक अडचणी निर्माण करतील. कामाशी काम ठेवा. पूर्वी घेतलेल्या परिश्रमाचे फळ मिळेल. नवीन परिचय लाभप्रद. व्यापारातील अडचणी दूर होतील. नोकरीत बढतीचे योग. आवक वाढल्याने किमती वस्तुची खरेदी करू शकाल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहिल. 
 
कुंभ: कामकाज नियमित सुरू ठेवा. नोकरीत अधिकारी वर्गाकडून शाबासकी मिळणार नाही. जुन्या अडचणी सतावतील. आर्थिक योग मध्यम राहतील. खर्च जास्त झाल्याने नियजन डगमगेल. देणी जड होतील. सौदे बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. प्रवास करताना दरम्यान काळजी घ्या.
 
मीन : यश देणारा कालखंड. सहकार्य मिळत राहिल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन वातावरण उत्साह निर्माण करेल. फायद्याच्या योजनांवर चर्चा होईल. शुभवार्ता समजतील. नोकरी बढती संभवते. प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक योग अनुकूल. खरेदी कराल. कुटूंबातून चांगली बातमी कळेल. शुभ कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. प्रॉपर्टी, वाहन खरेदीचे योग संभवतात. प्रवास योग संभोवतो.