गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

शुभाक्षर करे भाग्य सुंदर

ज्या जातकाचे नामकरण करायचे असेल, त्याची जन्मतारीख व जन्मवेळेनुसार आलेल्या राशीच्या आद्याक्षरानुसार नाव ठेवले जाते. त्यासोबत जर अंकशास्त्रानुसार अभ्यास करून जातकाच्या जन्मतारखेवरून क्रमांक व प्रारब्धांक पाहून योग्य नाव ठेवल्यास अधिक लाभ त्या जातकाला होऊ शकतो.


उदा. जन्मतारीख १४/३/१९६५- १४चा ५ हा क्रमांक येतो.१+४+३+१+९+६+५=२+९=२ या तारखेच्या अभ्यासाअंती कर्क राशी येते त्यामुळे ह किंवा ड आद्याक्षरावरून आपण नाव ठेवू शकतो. सोबत जर का आपण क्रमांक व प्रारब्धांकानुसार नाव ठेवल्यास जातकास अधिक लाभ होऊन पुढील जीवनात जातक चांगली प्रगती करू शकतो.

नावाच्या सुरुवातीला येणारे अक्षर जन्मतारखेच्या राशीनुसार व शुभाक्षरानुसार, अंकशास्त्रानुसार स्पंदनाशी जुळत असेल तर जास्त लाभदायक ठरते.

१)  ज्यांची जन्मतारीख १, १0, १९ व २८ आहे, अशा लोकांच्या नावाची सुरुवात ए, आय, जे, वाय, डी, एम, टी अक्षराने करावी. मात्र एफ, पी, यू, व्ही, डब्ल्यू अशी सुरुवात करणे टाळावे.
 
पुढील पानावर पहा जन्मतारीख २, ११, २0 व २९
 
२) ज्यांची जन्मतारीख २, ११, २0 व २९ आहे, अशा लोकांच्या नावाची सुरुवात ए, आय, जे, वाय, बी, के, आर आणि यू, व्ही, डब्ल्यू यापैकी एखाद्या अक्षराने करावी. मात्र एस, पी, एफ अशी सुरुवात करणे टाळावे. 

पुढील पानावर पहा जन्म तारीख ३, १२, २१ व ३0 
३) ज्यांची जन्मतारीख ३, १२, २१ व ३0 आहे, अशा लोकांच्या नावाची सुरुवात सी, जी, एल, एस, यू, व्ही आणि डब्ल्यू या अक्षराने करावी. मात्र ए, आय, जे, वाय, डी, एम, टी, एक्स, एन अशी सुरुवात करणे टाळावे.
पुढील पानावर पहा जन्मतारीख ४, १३, २२ व ३१
४) ज्यांची जन्मतारीख ४, १३, २२ व ३१ आहे, अशा लोकांच्या नावाची सुरुवात ए, आय, जे, वाय, डी, एम, टी या अक्षराने करावी. मात्र एफ, यू, व्ही, डब्ल्यू अशी सुरुवात करणे टाळावे.
पुढील पानावर पहा जन्मतारीख ५, १४ व २३
५) ज्यांची जन्मतारीख ५, १४ व २३ आहे, अशा लोकांच्या नावाची सुरुवात ए, आय, जे, वाय, डी, एम, टी, ई, यू, व्ही, डब्ल्यू या अक्षराने करावी. मात्र एच, जी, सी, एफ, पी अशी सुरुवात करणे टाळावे.
पुढील पानावर पहा जन्मतारीख ६, १५ व २४
६) ज्यांची जन्मतारीख ६, १५ व २४ आहे, अशा लोकांच्या नावाची सुरुवात बी, के, आर, जी, एल, एस, यू, व्ही आणि डब्ल्यू या अक्षराने करावी. ए, आय, जे, डी, एम, टी, झेड, ओ या अक्षराने सुरुवात करणे टाळावे.
पुढील पानावर पहा जन्मतारीख ७, १६ व २५
७) ज्यांची जन्मतारीख ७, १६ व २५ आहे, अशा लोकांच्या नावाची सुरुवात बी, के, ए, आय, जे, वाय, डी, एम, टी या अक्षराने करावी. मात्र ए, आय, जे, वाय, बी, के आर या अक्षराने सुरुवात करणे टाळावे.
पुढील पानावर पहा जन्मतारीख ८, १७ व २६
८) ज्यांची जन्मतारीख ८, १७ व २६ आहे, अशा लोकांच्या नावाची सुरुवात सी, जी, एल, एस, यू, व्ही आणि डब्ल्यू या अक्षराने करावी. मात्र या ए, आय, जे, एम, टी, डी, के, एच, एन, एक्स, वाय, झेड, ओ अक्षराने सुरुवात करणे टाळावे.
पुढील पानावर पहा जन्मतारीख ९, १८ व २७
९) ज्यांची जन्मतारीख ९, १८ व २७ आहे, अशा लोकांच्या नावाची सुरुवात ए, आय, जे, वाय, सी, जी, एल, एस, यू, व्ही आणि डब्ल्यू या अक्षराने करावी.

बी, के, आर, एफ, पी, ओ, झेड या अक्षराने सुरुवात करणे टाळावे. अशाच प्रकारे योग्य त्या अक्षरानुसार (शुभाक्षर) तसेच जातकाच्या नावानुसार त्याने व्यवसाय व अस्थापनाचे नाव ठेवल्यास त्यात उत्तम यश लाभू शकते.

विशेष : समजा, मेष राशी आहे. त्याचे अक्षर अ आहे आणि अंकशास्त्रानुसार जन्मतारीख १९/११/१९७0 व चुकून अंकशास्त्रानुसार अक्षर अ व राशीनुसार नाव शुभ असूनही चकूनही अविनाश नाव ठेवू नये. कारण या नावाला हवी तशी प्रगती होत नाही. जीवनात बरेच नुकसान संभवते. तेव्हा शुभ अक्षरासोबत योग्य स्पंदनकारक नाव ठेवण्याची काळजी घ्यावी.

-अमरनाथ परब