आपली रास आणि होळीचे रंग, जीवन करतील रंगीन
जीवन सुखी आणि रंगीन व्हावं यासाठी राशीनुसार रंग वापरले तर होळी आपल्यासाठी निश्चितच आनंदी ठरेल.
मेष :- आपला शुभ रंग लाल व नारंगी आहे. पिवळ्या रंगाचे सगळे शेड्स देखील आपल्यासाठी योग्य ठरतील. या रंगांमुळे आपल्याला शक्ती आणि स्फूर्ती अनुभवेल.
वृषभ :- आपल्यासाठी निळे, काळे आणि हिरवे रंग उपयुक्त ठरतील. हे रंग आपल्याला ऊर्जावान ठेवतील.
मिथुन- आपला रंग हिरवा आहे. हिरव्या रंगामुळे आपण ताणमुक्त राहाल.
कर्कः- आपलं शुभ रंग क्रीम आहे, हा रंगा चंद्राचा आहे. या रंगामुळे आपली मानसिक शक्ती वाढेल.
सिंहः- आपलं रंग नारंगी आहे तसेच गुलाबी, लाल, पिवळा रंगाचे शेड्स देखील आपल्यासाठी चांगले आहे. या रंगामुळे नवीन जोश आणि उत्साह निर्माण होईल.
कन्याः- गडद हिरवा रंग आपल्यासाठी ऊर्जा आणि संपन्नतादायक ठरेल. या रंगामुळे ताण दूर होईल.
तूळ :- आपलं रंग निळा, काळा आणि हिरवा आहे. हा रंग आपल्यासाठी लाभदायक आहे.
वृश्चिक :- आपला रंग लाला आहे. लाल रंगामुळे ऊर्जा वाढेल.
धनू आणि मीनः- आपला शुभ रंग पिवळा आणि लाल आहे. स्वत:वर नियंत्रण ठेवल्यात पिवळा रंग मदत करेल.
मकर आणि कुंभ :- काळा, निळा आणि जांभळा रंग आपल्यासाठी शुभ ठरेल.