सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

महाशिवरात्रीला राशीनुसार करा महादेवाला प्रसन्न, या प्रकारे करा पूजा

या वर्षी महाशिवरात्री शुभ पर्व 4 मार्च 2019 रोजी आहे. या संदर्भात चला जाणून घ्या महादेवाला राशीनुसार कशा प्रकारे प्रसन्न करता येऊ शकतं ते:
 
मेष - गुळाच्या पाण्याने अभिषेक करावा. लाल मिठाईचा नैवेद्य दाखवावा. लाल चंदन आणि पांढर्‍या फुलाने पूजा करावी.
मंत्र- ॐ नमः शिवाय
 
वृषभ - दह्याने अभिषेक करावा. साखर, तांदूळ, पांढरं चंदन आणि पांढर्‍या फुलाने पूजा करावी.
मंत्र - ॐ मृत्युंजयाय नमः
 
मिथुन - उसाच्या रसाने देवाचा अभिषेक करावा. मूग, दूब आणि कुश याने पूजा करावी.
मंत्र - ॐ ओमकाराय नमः
 
कर्क - तुपाने अभिषेक करून तांदूळ, कच्चं दूध, पांढरे आक व शंखपुष्पीने शिवलिंगाची पूजा करावी.
मंत्र - ॐ महाकालाय नमः
 
सिंह - गुळाच्या पाण्याने अभिषेक करून गूळ आणि तांदळाने तयार खिरीचा नैवेद्य दाखवावा. मंदाराचे फुले अर्पित करावी.
मंत्र - ॐ त्रयंबकाय नमः
 
कन्या - उसाच्या रसाने शिवलिंगा अभिषेक करावे. महादेवाला भांग, दूब आणि पान अर्पित करावे.
मंत्र - ॐ उमापतयै नमः
 
तूळ - सुगंधित तेल किंवा अत्तराने देवाचे अभिषेक करून दही, मधुरस आणि श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा. पांढर्‍या फुलांनी महादेवाची पूजा करावी.
मंत्र - ॐ वृषभध्वजाय नमः
 
वृश्चिक - पंचामृताने अभिषेक करावा.
मंत्र - ॐ चन्द्रमौलिने नमः
 
धनू - हळदीच्या दुधाने अभिषेक करून बेसनाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. लिलीच्या फुलांनी त्यांची पूजा करावी.
मंत्र - ॐ पिनाकपाणिने नमः
 
मकर - नारळ पाण्याने अभिषेक करून उडीद डाळीने तयार मिठाईचा देवाला नैवेद्य दाखवावा. नीलकमालच्या फुलांनी पूजा करावी.
मंत्र- ॐ सद्य़ोजाताय नमः
 
कुंभ - तिळाच्या तेलाने अभिषेक करून उडदाने तयार मिठाईचा नैवेद्य दाखवावा. शमीच्या फुलांनी पूजा करावी.
मंत्र - ॐ हरिहराय नमः
 
मीन - केशरयुक्त दुधाने महादेवाचे अभिषेक करून दही भाताचा नैवेद्य दाखवावा. पिवळ्या सरस आणि नागकेशराने पूजा करावी.
मंत्र - ॐ वैद्यनाथाय नमः