सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

आपल्यासाठी योग्य धातू जाणून घ्या

राशीनुसार 9 ग्रहांशी संबंधित वेगवेगळ्या धातू सांगण्यात आल्या आहेत. जाणून घ्या कोणत्या राशीसाठी कोणता धातू शुभ आहे ते:
 
सोनं :- सोनं मेष, सिंह, वृश्चिक, धनू आणि मीन राशीच्या जातकांसाठी अत्यंत लाभदायक आहे कारण सोनं या धातूचा कारक ग्रह गुरु आहे.
 
चांदी :- चांदी धातू वृषभ, कर्क, तूळ, राशीच्या जातकांसाठी विशेष रूपाने फायदेशीर आहे. या धातूचा स्वामी चंद्रमा आहे.
 
लोखंड :- लोखंड मकर आणि कुंभ राशीच्या जातकांसाठी अती उत्तम मानली गेली आहे. या लोकांनी लोखंडाची अंगठी आपल्या मध्यमा बोटात धारण केली पाहिजे. या धातूचा कारक ग्रह शनी देव आहे.
 
तांबा :- तांबा धातू मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक आहे. या धातूचा स्वामी ग्रह सूर्य आहे.
 
पितळ :- पितळ धातू सोन्याप्रमाणेच मेष, सिंह, वृश्चिक धनू आणि मीन राशीच्या लोकांसाठी फलदायक आहे. या धातूचा कारक गुरु आहे.
 
कांस्य :- कांस्य एक मिश्रित धातू आहे आणि बुध ग्रहाशी संबंधित धातू मानली गेली आहे. मिथुन आणि कन्या राशीच्या जातकांसाठी कांस्य धातू सर्वोत्तम आहे.