शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 (12:27 IST)

सर्व दोषांपासून मुक्त व्हायचे असेल तर माघ पौर्णिमेला गायीला हे खाऊ घाला

Magh Purnima 2024 हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा असेही म्हणतात. माघी पौर्णिमेच्या दिवशी जे दान आणि स्नानासोबत हवन करतात त्यांना भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. शिवाय त्यांच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूच्या माधव रूपाची पूजा केली जाते. माधव स्वरूपाची पूजा करणाऱ्यांना शुभ फळ मिळते.
 
मान्यतेनुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी गायीला अन्नदान करणे अत्यंत शुभ आणि श्रेष्ठ मानले जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी गायीला खाऊ घालणाऱ्यांवर लक्ष्मी देवी प्रसन्न होते. तसेच त्यांच्या घरात कधीही पैशाची आणि धान्याची कमतरता भासत नाही. तर जाणून घ्या की माघ पौर्णिमेच्या दिवशी गायीला काय खाऊ घालावे.
 
ज्योतिषशास्त्रानुसार वर्षात 12 महिने असतात आणि 12 महिन्यांपैकी 4 महिने सर्वोत्तम मानले जातात. चार महिने पुढीलप्रमाणे - वैशाख, श्रावण, कार्तिक आणि माघ. माघ महिन्यात येणारे पौर्णिमेचे व्रत अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. 2024 मध्ये पौर्णिमा व्रत 24 फेब्रुवारीला आहे.
 
ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी जसे दान आणि स्नानाचे महत्त्व आहे, त्याचप्रमाणे गाईची सेवा करणे देखील विशेष मानले जाते. कारण हिंदू धर्मात गायीला मातेचे रूप मानले जाते. गायींमध्ये 33 कोटी देवी-देवतांचा वास असल्याचे सांगितले जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी गाईची सेवा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात.
 
माघ पौर्णिमेच्या दिवशी गायीला ही वस्तू खाऊ घाला
ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी गायीला पोळी आणि गूळ खाऊ घालणे महत्त्वाचे आहे. तसेच गाईला हिरवा चारा द्यावा. गायीला हिरवा चारा किंवा भाकरी आणि गूळ खायला दिल्याने कुंडलीतील बुध बलवान होतो असे मानले जाते. म्हणजेच ज्या लोकांच्या कुंडलीत बुध कमजोर आहे किंवा कुंडलीत बुध दोष आहे त्यांनी गाईला हिरवा चारा खायला द्यावा. असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते.
 
जे लोक पौर्णिमेच्या दिवशी गाईला तिळाचे लाडू खाऊ घालतात, त्यांच्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तिळाचे लाडू खाऊ घातल्ल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. यामुळे घरातून सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात.