रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (23:01 IST)

20 नोव्हेंबरपासून या 4 राशींचे सुरू होतील चांगले दिवस

ज्योतिशास्त्रात एकूण ९ ग्रहांचे वर्णन केले आहे. प्रत्येक ग्रहाचाही एक स्वामी ग्रह असतो. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात तेव्हा ते सर्व १२ राशींवर परिणाम करतात. ज्या राशीत ग्रह गोचर होत आहे, त्या राशीच्या लोकांवर अधिक प्रभाव पडतो. 20 नोव्हेंबरला देवगुरु बृहस्पती देखील आपली राशी बदलणार आहेत. 20 नोव्हेंबर रोजी गुरू कुंभ राशीत प्रवेश करेल. गुरूच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व १२ राशींवर राहील. जाणून घ्या गुरू राशीत बदल झाल्यामुळे कोणत्या राशींची आर्थिक स्थिती सुधारेल-
 
1. मेष- मेष राशीच्या लोकांसाठी बृहस्पति राशी बदल शुभ ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. गुरु तुमच्या राशीच्या अकराव्या घरात प्रवेश करेल. यामुळे तुम्हाला करिअर आणि व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. या दरम्यान तुमचे रखडलेले कामही पूर्ण होईल.
 2. कर्क - गुरुच्या संक्रमणाच्या प्रभावामुळे तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे. या काळात नोकरदार लोकांची प्रगती होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील.
 3. कन्या- कन्या राशीच्या आठव्या घरात गुरु प्रवेश करेल. गुरूच्या संक्रमण काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. 
 4. मकर- गुरू राशीतील बदलाच्या प्रभावाने मकर राशीची आर्थिक बाजू मजबूत होईल. पैसे कमावण्याची शक्यता आहे. भाऊ-बहिणीचे नाते मधुर राहील. मात्र, या काळात तुम्ही गुंतवणुकीत अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
 
 या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.