शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (16:50 IST)

आता फक्त 1400 रुपयांत होणार विमान प्रवास! त्वरीत तिकिटे बुक करा, रूट लिस्ट आणि भाडे येथे पहा

आता तुम्ही देशातील सुंदर ठिकाणी अतिशय स्वस्तात फिरू शकता. एवढेच नाही तर आता विमानाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे सोपे होणार आहे. वास्तविक, एअरलाइन कंपनी इंडिगोने अनेक नवीन थेट उड्डाणांची घोषणा केली आहे. यासोबतच इंडिगोने म्हटले आहे की, आम्ही आमच्या प्रवाशांसाठी पॉइंट टू पॉइंट कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे.
 
विमान कंपनी इंडिगोने ही माहिती दिली 
एअरलाइन कंपनी इंडिगोचे म्हणणे आहे की थेट कनेक्टिव्हिटीमुळे प्रवास सुलभ होईल आणि पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अनोखा अनुभव मिळेल. यामुळे प्रवाशांनाही प्रवासाचे नियोजन करता येईल.
यापूर्वी, एअरलाइनने 2 नोव्हेंबर 2021 पासून शिलाँग आणि दिब्रुगड दरम्यान थेट उड्डाण सुरू केले आहे. त्याचे सुरुवातीचे भाडे फक्त 1400 रुपये आहे.
 
बुक कसे करायचे?
तुम्हालाही स्वस्तात प्रवास करायचा असेल तर इंडिगोच्या वेबसाइटवर जाऊन सविस्तर माहिती मिळवू शकता. याशिवाय, प्रवासी एअरलाइनच्या अधिकृत वेबसाइट https://www.goindigo.in/ वर जाऊन इंडिगो फ्लाइटचे तिकीट बुक करू शकतात.
 
12 तासांचा प्रवास फक्त 75 मिनिटात 
वाहतुकीचे कोणतेही थेट साधन उपलब्ध नसल्यामुळे, शिलाँग आणि दिब्रुगड दरम्यान प्रवास करण्यासाठी लोकांना रस्ता आणि ट्रेनने 12 तासांचा लांब प्रवास करावा लागला. पण आता फक्त 75 मिनिटांच्या फ्लाइटची निवड करून, दोन शहरांदरम्यान सहज उड्डाण करता येईल. 
 
कोणत्या शहरांमध्ये काय भाडे आहे ते पहा
- लेह जम्मू - 1854 रुपये
- जम्मू लेह - 2946 रुपये
- इंदोर जोधपुर - 2695 रुपये
- जोधपूर ते इंदूर - 2735 रुपये
- प्रयागराज ते इंदूर - 3429 रुपये
- इंदूर ते प्रयागराज - 3637 रुपये
- लखनौ ते नागपूर – 3473 रुपये
- नागपूर ते लखनौ – 3473 रुपये