गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (15:58 IST)

राज्य सरकारकडून पॅकेज जाहीर, पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

State government announces package of Rs 10
राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अखेर राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.   
 
राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले.  या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एन डी आर  एफ च्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय  घेतला आहे. 
 
ही मदत खालील प्रमाणे राहील… 
 
•    जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर
•    बागायतीसाठी १५  हजार रुपये प्रति हेक्टर
•    बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर
•    ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.