मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (15:56 IST)

महिलेची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या, मुलावर संशय

सोलापुरातील बार्शी तालुक्यातील एक धक्कादायक घटना घटनेत महिला झोपली असताना डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या करण्यात आल्याचे प्रकरण घडले आहे. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आल्याचे समजते. रुक्मिणी नागनाथ फावडे वय 45 असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे मृत महिलेचा मुलगा श्रीराम नागनाथ फावडे याच्यावर हत्येचा गुन्हा केल्याचा आरोप ठेवत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
 
हत्येनंतर मृतदेह गादीवरून ओढत घराबाहेर आणून झुडपात टाकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. 
 
नेमकं काय घडलं?
पोलिसांना वाणी प्लॉट या ठिकाणी घराच्या कपाऊंड मध्ये एका महीला झुडपामध्ये मृत अवस्थेत पडलेली असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी पोहचले. मृतदेह रुक्मिणी नागनाथ फावडे वय 45 वर्षे रा वाणी प्लॉट बार्शी हिचाच असल्याचे कळले. 
 
महिलाला रुक्मिणी आणि तिचा मोठा मुलगा 21 वर्षीय श्रीराम फावडे हे दोघेजण सदर ठिकाणी राहत होते. लहान मुलगा आणि पती यांच्यात नेहमी वाद होत असल्याने ते वेगळे राहत होते. तसेच मोठा मुलगा आणि आईमध्येही पैशा वरुन नेहमी वाद होत होते. त्या बाबत पोलीस स्टेशनला तक्रारी देखील दाखल होत्या. 
 
लहान मुलगा लक्ष्मण यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा मोठा मुलगा श्रीराम हा सध्या मुंबई येथे गेल्याचे कळले. श्रीराम फावडे याने यापुर्वी देखील आईस आणि भावास मारहाण केल्याचे समजते. त्यामुळे त्यानेच आई रुक्मिणीचा डोक्यात दगड घालून ठार मारल्याचा संशय पोलिसांना आहे.
 
 याच संशयातून पोलिसांनी श्रीराम फावडे याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.