शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोलापूर , शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (16:36 IST)

सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सुशीलकुमार व्यक्तींना फ्री पेट्रोल

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस एका वेगळ्याच पद्धतीने साजरा केला जात आहे. दिवसेंदिवस पेट्रोलचे दर वाढत असल्याने आज सोलापुरातील 'कारगीर' पेट्रोल पंपावर 501 रुपयांचं पेट्रोल मोफत मिळणार आहे. पण हा लाभ फक्त ज्यांचं नाव 'सुशील' किंवा 'सुशीलकुमार' आहे अशा व्यक्तींनाच मिळणार आहे.
पेट्रोल भरायला येत असताना ग्राहकाने 'आधार कार्ड' सोबत बाळगणे आवश्यक आहे. आज सकाळी 09 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हा उपक्रम सुरु असणार आहे. पेट्रोल भरायला येणाऱ्या प्रत्येकाचा यावेळी फेटा बांधून सन्मान ही करण्यात येत आहे. त्यामुळे आज पहाटेपासूनच कारगिर पेट्रोल पंपावर नागरिकांनी रांगा लावल्याचं चित्र पहायला मिळालं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलाय.