रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (12:15 IST)

गर्भवती पत्नीच्या पोटावर मारली लाथ, दिराने केला विनयभंग

एका पोलीस अधिकाऱ्यानं आपल्या गर्भवती पत्नीच्या पोटावर लाथ मारली तर दिराने विनयभंग केल्याची फिर्याद पीडित पत्नीने विजापूर पोलीस ठाण्यात केली आहे. आरोपीनं फिर्यादीच्या पोटात जोरात लाथ मारल्यामुळे रक्तस्त्राव होऊन तिचा गर्भपात झाला आहे. 
 
या धक्कादायक प्रकरणात पीडित महिलेनं विजापूर नाका पोलीस ठाण्यात आपल्या पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
 
आरोपी पोलीस अधिकारी हा मुंबई याठिकाणी पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. पीडितेचे 2020 मध्ये कुर्डुवाडी येथे विवाह झाला होता. सासरचे त्रास देत असून दीरानं विनयभंग केल्याचा आरोपही महिलेनं केला आहे. तसंच गर्भात वाढणारं बाळ पती स्वीकारण्यास तयार नव्हता म्हणून त्याने पोटावर जोरात लाथ मारुन तिचा गर्भपात घडवून आणला असंही ती म्हणाली. 
 
यानंतर आरोपीनं पीडितेला तिच्या माहेरी सोलापूर आणून सोडलं असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.