गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (17:24 IST)

चिंताजनक !मुंबईत आता डेंग्यूचा धोका,बीएमसीने इशारा दिला

कोरोना संसर्गानंतर मुंबईत डेंग्यूचा धोकाही वाढू लागला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मान्सूनशी संबंधित आजारांवरील अहवालात म्हटले आहे की, ऑगस्टमध्ये मुंबईत डेंग्यूचे 132 रुग्ण आढळले आणि त्यापैकी अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले.अशा वेळी जेव्हा संपूर्ण देश कोविड महामारीशी लढत आहे,कोणत्याही रोगाचा उद्रेक आता भीती निर्माण करत आहे. 
 
बीएमसीच्या आकडेवारीने हे दर्शवले आहे की,मुंबईत जुलै ते ऑगस्ट दरम्यान मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत किरकोळ वाढ झाली आहे.बीएमसीने आपल्या अहवालात म्हटले आहे.“डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पावसाळ्यात,डासांची पैदास रोखण्यासाठी सर्व खबरदारी घ्यावी.डासांचा चावा टाळण्यासाठी मच्छरदाणी, खिडकीचे पडदे,योग्य कपडे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 
 
लोकांनी स्व-शोधलेल्या औषधांवर अवलंबून राहू नये.ताप,डोकेदुखी,पुरळ,स्नायू आणि सांधेदुखीचा इतिहास असल्यास त्वरित उपचार घेण्याची शिफारस केली जाते कारण डेंग्यूमुळे मृत्यूचा धोका होऊ शकतो.
 
सध्या वांद्रे, खार, सांताक्रूझ, परळ इत्यादी भागात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.