शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (15:25 IST)

ब्रेकिंग न्यूज : भिवंडीत इमारत कोसळून एकाचा मृत्यू

भिवंडी शहरात आजमी नगर,टिपू सुलतान चौक परिसरात एक मजली इमारत कोसळली,या अपघातात सात जण जखमी झाले तर एक जणाचा मृत्यू झाला.या ठिकाणी बाजारहाट भरत असल्याचे सांगितले जात आहे.ही इमारत खाली बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांवर कोसळल्याची माहिती मिळाली आहे.
 
जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या अपघातात सात जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
 
अपघाताचे कळतातच घटनास्थळी तातडीने अग्निशमन दल,पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक दाखल झाले.