मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (22:22 IST)

अमृता फडणवीस यांनी घेतली इंडियन आयडलची भेट

काही दिवसांपूर्वी इंडियन आयडल १२ मध्ये  पवनदीप राजनने  ट्रॉफी जिंकली. त्यानंतर आता पवनदीपने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
 
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर भेटीचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी, ‘इंडियन आयडल विजेते पवनदीप राजन आणि अरुणिता कांजिवाल यांनी माझ्या मुंबईतील निवासस्थानी भेट दिली, तेव्हा त्यांचे मन:पूर्वक स्वागत, अभिनंदन केले. हे दोघेही अतिशय चांगले गायक, कलावंत आहेत. त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या’ असे कॅप्शन दिले आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये देवेंद्र फडणीवस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, पवनदीप राजन, अरुणिता कांजिवा आणि इतर काही लोक दिसत आहेत.