शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जुलै 2021 (15:34 IST)

पंतप्रधानांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भेट,कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.या दरम्यान त्यांची व्हिडियो कॉन्फरसिंग द्वारे कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत चर्चा झाली.पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर कोरोनाच्या वाढत्या प्रकारणाबद्दल काळजी व्यक्त केली.
 
सध्या या घडीला संपूर्ण देश कोरोनाला लढा देत आहे.जरी याची गती मंदावली आहे तरी ही कोरोना अद्याप संपलेला नाही.सध्या अनेक राज्यात कोरोनाचे थैमान सुरु आहे.त्यापैकी काही राज्यात कोरोनाची परिस्थती फारच गंभीर आहे.

पंत प्रधान मोदी यांनी याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.त्यांनी त्या वेळी महाराष्ट्र,केरळच्या वाढत्या कोरोनाच्या प्रकरणाबाबत चिंता व्यक्त केली असून राज्यांना कोरोनाशी कसे लढायचे हे मन्त्र देखील दिले.
 
पंत प्रधान मोदी यांनी व्हिडियो कॉन्फरसिंगच्या माध्यमातून महाराष्ट्र, केरळ, आंध्रप्रदेश,कर्नाटक,ओडिशा,या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.या मध्ये त्यांनी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी उपाययोजनांबद्दल चर्चा केली.टेस्ट,ट्रॅक,ट्रीट नंतर लसीकरणामुळेच आपण या तिसऱ्या लाटेवर प्रभुत्त्व मिळवू .ग्रामीण भागांवर अधिक लक्ष देणे आणि चाचण्या वाढविण्याबाबत देखील त्यांनी सांगितले.तसेच लसीकरण देखील वाढवायला हवे असे देखील ते म्हणाले.

सध्या देशात लॉक डाऊन संपले आहे त्यामुळे लोक गर्दी करत आहे.काही राज्यात रिव्हेंज टुरिझम, रिव्हेंज शॉपिंग सुरु झाल्यामुळे लोक गर्दी करत आहेहे असं निष्कजीपणाने वागणे आपल्यासाठी धोकादायक होऊ शकतं 
 
सध्या युरोपात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे आपल्याला सावधगिरी बाळगणे हे महत्त्वाचे आहे.त्यामुळे निष्काळजीपणा करणे हे आपल्या साठी घातक ठरू शकतं.सतर्क राहा,सावधगिरी बाळगा आणि त्यासाठी काही उपाययोजनावर भर द्या असं पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना म्हणाले