मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (08:28 IST)

सोलापुरातील तरुणीची मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेसाठी निवड

फोटो साभार -इंस्टाग्राम 
सोलापुरातील तरुणीची मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे ही तरुणी डॉक्टर आहे. मिस इंडियासाठी निवड झालेली या तरुणीचं नाव डॉक्टर इशा अभय वैद्य असं आहे.फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यात 26 मुलींमधून ती निवडली गेली.त्यानंतर जयपूरमध्ये दुसरी चाचणी पार पडली.या चाचणीतही इशाची निवड झाली. 

यानंतर आता तिसरी चाचणी ही राजधानी दिल्लीत पार पडणार आहे.या तिसऱ्या चाचणीसाठी इशा सहभागी झाली आहे.त्यामुळे या स्पर्धेत इशाची निवड झाली,तर तिला इंटरनॅशनल, मिस मल्टिनॅशनल, मिस एशिया पॅसिफिक या स्पर्धांमध्ये तिला संधी मिळणार आहे.