मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (08:22 IST)

अकरावी ऑनलाईन प्रवेशसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटची तारीख

अकरावी ऑनलाईन प्रवेशसाठी अर्ज करण्यासाठी सोमवारी २३ ऑगस्ट ही शेवटची तारीख देण्यात आली असून आज रात्री ११ वाजेर्यंत विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशाठी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे. आतापर्यंत मुंबईसह पुणे,नाशिक आणि अमरावती मधून २ लाख ७२ हजार ६४२ विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केला आहे.अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी २३-२४ ऑगस्ट दरम्यान जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . सर्वसाधारण गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतील स्थान कळणार आहे. त्याचप्रमाणे सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर अर्जातील चुका दुरुस्त करण्यासाठी संधी देखील दिली जाणार आहे. त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
 
यंदा दहावीचा निकाल हा ९९.९५ टक्के लागला.त्यानंतर विद्यार्थ्यांनी CET परीक्षांची तयारी करण्यास सुरुवात केली मात्र सीईटी परीक्षांवर मोठा गोंधळ उडाला होता. सीईटी परीक्षा न घेता दहावीच्या गुणांवर अकरावी प्रवेश प्रक्रिया करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकार आणि शिक्षण विभागाकडून घेण्यात आला.त्यामुळे आता होणारी अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही दहावीच्या गुणांवर आधारित आहे.