रविवार, 22 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (08:03 IST)

इंदुरीकर महाराज यांनी निलेश लंके यांच्या समर्थनात केले भाष्य

संत तुकारामांना समाजाने त्रास दिला ते जगदगुरू झाले, ज्ञानेश्‍वर ज्ञानीयांचे राजा झाले, शिवाजी महाराज छत्रपती झाले,असे सांगत टिकाकारांकडे लक्ष न देता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी आपले समाजकार्य असेच पुढे सुरू ठेवण्याचा सल्ला प्रबोधनकार इंदुरीकर महाराज देशमुख यांनी दिला.पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आत्महत्येचा इशारा दिला आहे. यावेळी ज्योती देवरे यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  
 
श्रावणानिमीत्त कोविड उपचार केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या हरिनाम सप्ताहात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन झाले. यावेळी त्यांनी आमदार लंके यांच्या कामाचे कौतुक केले.“जे दगड घाव सहन करतात तेच देवाच्या मुर्तीसाठी वापरले जातात. आमदार लंके सर्वात जास्त घाव सहन करणारा दगड आहेत.ज्या झाडाला जास्त फळ ती झाड वाकतात, तीच जास्त दिवस टिकतात.आमदार लंके यांचे झाड वाकलेलं आहे. त्यामुळे ते राजकरणात २५ वर्षे टिकणार” असे भाकीत इंंदुरीकर महाराज यांनी केले आहे.
 
गरीबांची सेवा केल्यावर माणूस देव होत नाही. मात्र त्याला देवपण आल्याशिवाय राहत नाही. हजारो रुग्णांच्या उपचारांची व्यवस्था करणारे नीलेश लंके त्या रुग्णांसाठी केवळ आमदार नाहीत तर देव आहेत‌. मानवाची सेवा हीच ईश्‍वर सेवा असल्याचे इंदुरीकर महाराज म्हणाले.“आमदार लंके समाजाच्या भल्यासाठी काम करीत आहेत. चांगले काम करणाऱ्यांना त्रास होतोच. जितका त्रास जास्त होतो तेवढा माणूस मोठा होतो.”, असे देखील इंदुरीकर महाराज म्हणाले.
 
“भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरात (कोविड उपचार केंद्र)अध्यात्मिक वातावरण आहे. ज्ञानेश्वरीचे पारायण झाले आहे. ज्ञानेश्वरीची,अध्यात्माची ताकद आणि आमदार नीलेश लंके यांचे प्रयत्न यामुळे हजारो करोनाबाधितांनी करोनावर मात केली.या उपचार केंद्रात एकही मृत्यू झाला नाही,”असे प्रतिपादन इंदुरीकर महाराज देशमुख यांनी केले.