रविवार, 22 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (22:40 IST)

गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, सामान्य गरीब मराठा बांधवांच्यावर का?

मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये शुक्रवारी मराठा समाजाने आंदोलन केलं. या प्रकरणी २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कारवाईवर खासदार संभाजीराजे छत्रपती संताप व्यक्त केला. गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, सामान्य गरीब मराठा बांधवांच्यावर का? असा सवाल संभाजीराजे यांनी केला.
 
संभाजीराजे यांनी ट्विट करत पोलिसांच्या कारवाईवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय असं का? असा सवाल देखील संभाजीराजे यांनी केला आहे. “गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा! सामान्य गरीब मराठा बांधवांच्यावर का? समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का?” असं ट्विट संभाजीराजे यांनी केलं आहे.