शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (22:03 IST)

माजी मंत्री संजय राठोड यांना शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपाप्रकरणी क्लीनचीट

Clean chit to former minister Sanjay Rathore for allegedly seeking bodily pleasures
माजी मंत्री संजय राठोड  यांना शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपाप्रकरणी क्लीनचीट देण्यात आली आहे. यवतमाळ पोलिसांनी ही क्लीनचीट दिलेली आहे.  नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एका महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप राठोड यांच्यावर करण्यात आला होता. पोलिसांना पाठवण्यात आलेल्या अर्जामध्ये महिलेच्या पतीचे नाव चुकलेले आहे. तसेच त्या अर्जावरील सही अर्जात नमुत केलेल्या महिलेची नाही. महिलेची राठोड यांच्याविषयी काहीही तक्रार नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे. 
 
विशेष चौकशी पथकाने केलेल्या चौकशीअंती माजीमंत्री व आमदार संजय दुलीचंद राठोड यांच्याविरुद्ध करण्यात आलेला तक्रार अर्ज महिलेने स्वतः पाठविलेला नाही.  या अर्जामध्ये महिलेच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. अर्जावरील सही त्या महिलेची नाही. महिलेच्या पतीचे नावसुद्धा चुकीचे टाकलेले आहे. त्यामुळे महिलेच्या नावाने पाठवलेला अर्ज खोटा आहे. महिलेची आमदार संजय दुलीचंद राठोड यांच्याविषयी काही तक्रार नाही. नमूद महिलेच्या नावाने कुणीतरी खोडसाळपणे स्पीडपोस्टाने हा तक्रार अर्ज केल्याचे निष्पन्न झालेले आहे. अर्जात नमुद केलेल्या महिलेचा व महिलेच्या कुटुंबाचा तक्रार अर्जाशी काहीएक संबंध नाही, असे यवतमाळचे एसपी दिलीप पाटील यांनी सांगितले आहे.