1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (16:42 IST)

हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेले हवामान अंदाज

maharashtra-weather-update
बऱ्याच दिवसापासून उत्तर भारतात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. तसेच विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागात पाऊस पडत आहे. तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा आता विरळला असून त्याचे चक्रकार वाड्यात रूपांतर झाले आहे.
 
तर मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थान पासून मध्यप्रदेश, छत्तीसगड तसेच ओडिसा हुन बंगालच्या उपसागरात विस्तारला आहे.
 
तर विदर्भातील चक्रकार वारे आता मध्य प्रदेश च्या परिसरात सक्रीय आहे. तर या हवामान प्रणालीमुळे आज राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
 
तर आज कोकणातील ठाणे, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच नाशिक या जिल्ह्याच्या तुरळक एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.