शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (16:19 IST)

गणोशोत्सव साजरा करण्यासाठी शिवसेनेकडून मोफत बससेवा

Free bus service
कल्याण – शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने गणोशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाण्याकरीता वतीने मोफत बस सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने चाकरमाणी मेटाकूटीला आला आहे. तसेच कोकणावर अतिवृष्टीने मोठे संकट ओढावले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी त्यांच्या आप्तस्वकीयांसोबत गणोशोत्सव साजरा करण्याकरीता जाण्यासाठी कोकणवासीय चाकरमान्यांची प्रचंड ओढ आहे. 
 
महाड, मंडणगड, दापोली, खेड, चिपळून मार्गे गुहागर, रत्नागिरी, मालवण, देवगड, वेंगुर्ला, कणकवली, सावंतवाडी येथे गणोश उत्सव साजरा करण्यासाठी जाण्याकरीता डोंबिवलीतून मोफत बस सेवा दिली जाणार आहे. डोंबिवलीशिवसेना शहर शाखेतील सतीश मोडक,संतोष चव्हाण, सागर जेधे यांच्याशी संपर्क साधावा. बसमध्ये सीट आरक्षीत करण्यासाठी 4 सप्टेंबर ही शेवटची तारीख असेल अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी दिली आहे.