शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (22:25 IST)

नालासोपारात साक्षी ज्वेलर्सवर दरोडा, मालकाची हत्या

मुंबईतील नालासोपारा (पश्चिम) येथील साक्षी ज्वेलर्सवर या दुकानावर शनिवार दरोडा पडला. दोन हल्लेखोरांनी दुकानाचे मालक किशोर जैन यांची हत्या करून लाखोंचा ऐवज लुटून नेला. 
 
नालासोपारा (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एसटी डेपो रोडवर साक्षी ज्वेलर्स हे दुकान आहे. शनिवारी सकाळी दुकानाचे मालक किशोर जैन यांनी नेहमी प्रमाणे दुकान उघडले. सकाळची वेळ असल्याने दुकानात अन्य कर्मचारी नव्हते. जैन दुकानात पूजा करत असताना दोन अज्ञात व्यक्ती दुकानात शिरले. त्यांनी जैन यांच्याकडे लॉकरची चावी मागितली. मात्र जैन यांनी चावी देण्यास नकार दिला. त्यामुळे हल्लेखोरांनी जैन यांच्यावर चाकूने सपासप वार केले. लॉकर उघडता न आल्याने हल्लेखोर दुकानामधील लाखो रुपयांचे दागिने घेऊन काही क्षणातच पसार झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या किशोर जैन यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या लूट आणि हत्येचा घटनेने व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून हल्लेखोरांचा शोधासाठी विविध पथके रवाना झाली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे.