सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

Ganesh Chaturthi 2019: राशीप्रमाणे करा या रंगाच्या गणपतीची स्थापना, घरात सुख नांदेल

गणेश चतुर्थीला राशीनुसार गणपतीची स्थापना केल्याने चांगलं फळ प्राप्त होतं. जाणून घ्या कोणत्या राशीच्या जातकांनी कोणत्या रंगाच्या गणपतीची स्थापना केली पाहिजे. 
 
मेष
या राशीचा स्वामी मंगळ ग्रह असून लाल रंगाचं प्रतिनिधित्व करतं. मेष राशीच्या जातकांनी गणेश चतुर्थीला लाल रंगाच्या गणपतीची मूर्ती स्थापित करावी. याने नोकरीत येत असलेल्या अडचणी दूर होतील.
 
वृषभ
या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. म्हणून वृषभ राशीच्या जातकांनी हलक्या निळ्या रंगाच्या गणपतीची स्थापना करावी. याने व्यक्तीला आपल्या जीवनात सर्व सुख-सुविधा प्राप्त होतात.
 
मिथुन
या राशीचा स्वामी ग्रह बुध असून हलक्या हिरव्या रंगाचा गणपती स्थापना करणे या राशीच्या जातकांसाठी योग्य ठरेल. असे केल्याने बुद्धी आणि बल प्राप्ती होते.
 
कर्क
या राशीचा स्वामी चंद्र आहे. गणेश चतुर्थीला या राशीच्या जातकांनी पांढर्‍या रंगाच्या गणपतीची मूर्ती स्थापित केली पाहिजे. याने जीवनात सुख आणि शांती कायम टिकते.
 
सिंह
सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीच्या जातकांनी शेंदुरी रंगाची गणपतीची मूर्ती स्थापित केली पाहिजे. असे केल्याने सन्मान प्राप्ती होते.
 
कन्या
या राशीचा स्वामी बुध आहे. म्हणून कन्या राशी असणार्‍यांनी गणेश चतुर्थीला गडद हिरव्या रंगाची गणपतीची मूर्ती स्थापित केली पाहिजे. याने व्यवसायात फायदा मिळतो.
 
तूळ
या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. या राशीच्या जातकांनी पांढर्‍या रंगाच्या गणपतीची मूर्ती स्थापित केली पाहिजे. असे केल्याने विवाहित जीवनात आनंद राहण्यास मदत मिळते.
 
वृश्चिक
या राशीचा स्वामी मंगळ ग्रह असल्यामुळे लाल रंगाच्या गणपतीची मूर्ती स्थापित करणे या राशीच्या जातकांसाठी योग्य ठरेल. असे केल्याने वृश्चिक राशीच्या जातकांच्या जीवनातून सर्व समस्या दूर होतात.
 
धनू
या राशीचा स्वामी वृहस्पति ग्रह आहे. पिवळा रंग वृहस्पति देवाशी जुळलेला आहे. धनू रास असणार्‍यांनी गणेश चतुर्थीला पिवळ्या रंगाच्या गणपतीची स्थापना केली पाहिजे. याने देवाचा आशीर्वाद प्राप्त होऊन जीवनात सुख-समृद्धी 
 
येते.
 
मकर
या राशीचा स्वामी शनी ग्रह मानला गेला आहे. मकर राशीच्या जातकांनी गणेश चतुर्थीला हलक्या निळ्या रंगाच्या गणपतीची मूर्ती स्थापित केली पाहिजे. असे केल्याने शनीच्या प्रकोपापासून मुक्ती मिळते.
 
कुंभ
या राशीचा स्वामी शनीदेव असल्याने गणेश चतुर्थीला गडद निळ्या रंगाच्या गणपतीची मूर्ती स्थापित करणे या राशीच्या जातकांसाठी योग्य ठरेल. असे केल्याने जीवनातील संकट दूर होतील.
 
मीन
या राशीचा स्वामी वृहस्पति आहे. मीन राशीच्या जातकांनी गणेश चतुर्थीला गडद पिवळ्या रंगाच्या गणपतीची स्थापना केली पाहिजे. याने जीवनात सुखाचे दिवस बघायला मिळतात.