गणपतीला प्रिय आहे हे फूल
देवा गणेशाच्या पूजेत फुलांचं वेगळंच महत्त्व आहे. गणपतीला तुळस सोडून सर्व फुलं आवडतात.
गणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले अर्पण करायला हवी.
याव्यतिरिक्त चांदणी, जाई आणि पारिजातकाच्या फुलांचा हार अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात.
तसेच दूर्वा गणपतीला प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना पांढर्या किंवा हिरव्या दूर्वा वाहाव्या. एकवीस दूर्वांची मिळून केलेली जुडी गणपतीला अर्पण करताना असा श्लोक म्हणावा -
ॐ काण्डात्काण्डात्प्ररोहन्ती परूषः परूषः परि।
एवानो दूर्वे प्रतनु सहस्त्रेणशतेनच।।
श्री महागणपतये नमः। दुर्वांकुरान् समर्पयामी।