शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Modified: शनिवार, 22 सप्टेंबर 2018 (10:43 IST)

ओंकारोपासनेचे उपास्य दैवत शिवगणेश ।

कामादिशत्रून्‌ सृणिना निहंसि
भक्तो विकामो न 
विभेति कस्मात्।
लब्ध्या परां शान्तिमुपैति मुक्तिम्    
प्रसन्नचित्तो रमते विमुक्त: ॥
 
अस्ति, भाति, नश्ति आणि पश्यति व क्षेमं! हे सगळे या वस्तुमत्रांचे, जीवमात्रांचे वैशिष्ट्यपूर्ण असे स्वभाव धर्म आहेत. वाढ आमचीसुद्धा होते, गुलाबाचीसुद्धा वाढ होते, त्याला फुले येतात. निसर्गामध्ये, झाडांमध्ये वनस्पतींची वाढ होते. फुलं, मुलं बघितली की आपल्याला आनंद होतो. परंतु आमच्या वाढीमध्ये होणारा आनंद आणि फुलं, मुलं पाहिल्यावर होणारा आनंद ऋषींच्या मते यामध्ये फरक आहे. यजुर्वेदाच्या 36 व्या विभागामध्ये शांतीचा एक विशिष्ट विभाग आहे. 'शांतिः' यामध्ये असं म्हटलं, 'शांतिरेव शांतिः। इथे हा फरक त्यांनी स्पष्ट केला आहे की, मानवाची होणारी वाढ, प्राणंची होणारी वाढ आणि वनस्पतींची होणारी वाढ यामध्ये फरक आहे. वनस्पतींची होणारी वाढ ही शांती देते आणि आमची होणारी वाढ ही सुख देते. यामध्ये सूक्ष्मफरक आहे. द्यो:शान्तिरन्तरिक्षं शान्तिःपृथिवीशान्तिः विश्वेदेवा शान्तिः, ब्रह्मशान्तिः, सर्व शान्तिः, शान्ति रेव शान्तिः, सामा शान्तिरेधीः। हे सूत्र फार महत्त्वाचे आहे. ज्या वेळेला आम्ही वृद्धिंगत होतो, ज्यावेळेला आम्ही आमच्या माहितीचं कोठार जे भरतो, पण हे करत असताना आमचा अहंकारसुद्धा वाढतो. वनस्पतीचा अहंकार मात्र वाढत नाही. निसर्गामध्ये जी वृद्धी होते, ती अहंकारशून्य वृद्धी होते. त्यामुळे ती शांति प्रदान करणारी ठरते, हा विचार महत्त्वाचा आहे.
 
शंकरांना कधी गर्व झाला नाही, तो झाला होता असुरांना, सूरवृत्ती जी आहे ती गर्वहीनच आहे. रावण, कर्ण अतिशय हुशार होते, शूरही होते परंतु त्यांना गर्वाला जिंकता आले नाही. त्यामुळे कर्णाची नेहमी शोकांतिका झाली. भगवंताच्या सहवासात होते, परंतु षड्‌रिपुंना आपल्या बरोबर घेऊन! त्यामुळे भगवंताचा अंकुश त्यांना वाचवू शकत नाही.
 
महत्त्वाच्या व्यक्तीला किंवा नेत्याला गर्व होता कामा नये. हा गर्व सत्‌कर्मापासून व्यक्तीला दूर नेतो! ही शांती कशी आहे, याचे स्वरूप यजुर्वेदामध्ये निश्चित केले आहे. तेच स्वरूप अभर्वणाला अभिप्रेत आहे. काम, क्रोध, लोकांतील शांती, हेच आत्म्याचे परमशुद्ध स्वरूप आहे. परशांतीच्या स्तरावरील आतनुभूती माला हवी आहे. म्हणून ओंकारोपासनेचे उपास्य दैवत शिवगणेश आहे. 
 
तो आपल्या अंकुशाने भक्तांना कामादिशत्रूंपासून वाचवतो व परमश्रेष्ठत्व देऊन समाधान व शांति देतो. 'आधिव्याध्युपाश्चिभ्यो निमुक्तो भवति, संसारबन्धनादीप मुक्तो भवति' करून त्यांना प्रसन्नचित्त बहाल करतो. तो भक्त मुक्तमनाने ब्रह्मनंदाचा रोज विहार करतो.
 
विठ्ठल जोशी