सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (08:47 IST)

असा साजरा होतो अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव

सर्वजण गणेश चतुर्थीच्या गणपतींची प्रतिष्ठापना करून पूजन करतात. मात्र कुडाळ – सांगिर्डेवाडीतील कृष्णा शंकर साळगांवकर यांच्या घरी गणेश चतुर्थीच्या पाचव्या दिवशी नवीन गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. हा गणपती वर्षभर ठेवला जातो हे विशेष आहे. साळगांवकर कुटूंबियांचा पाच पिढ्यांचा वारसा जपणारा हा गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरत असून अशी अनोखी परंपरा जपणारा हा कोकणातील एकमेव गणेशोत्सव आहे.
 
मुळ कविलकाटे येथील हे साळगांवकर कुटूंबीय काही वर्षापूर्वी कुडाळ-सांगिर्डेवाडी येथे स्थायिक झाले. या कुटूंबातील कृष्णा साळगांवकर हे स्वतः गणेशमुर्तीकार आहेत. साळगांवकर ते त्यांच्या घरात पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार गणेशमुर्ती बनवण्यास सुरूवात करण्यापूर्वी इतर गणपती शाळांप्रमाणे मुहूर्ताचा गणपती बनवतात. मात्र हा गणपती घरात इतरत्र न ठेवता हाच गणपती पूजेला लावतात. या मुहूर्ताच्या गणपतीसोबत आणखी एक लहान गणपती ठेवला जाते. कुठलीही मोडतोड न करता जसा आकार येईल अशी गणेश मुर्ती बनविली जाते.