गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 11 सप्टेंबर 2018 (16:01 IST)

शरिरसुख द्या, घर मोफत भाड्याने घ्या, बीबीसीचे स्टिंग मोठी खळबळ

जगातील सर्वात मोठी माध्यम संस्था असलेल्या बीबीसीच्या एका स्टिंग ने मोठी खळबळ उडाली आहे. या नुसार भाड्याने घर शोधणाऱ्या महिलांना काही घर मालक फुकटात राहण्याची मुभा देत असून फक्त अट एवढीच आहे की आठवड्यातून एकदा शैय्यासोबत करायची आहे. असे बरेच विकृत घरमालक या स्टींग ऑपरेशनमुळे उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे साहेबांच्या देशात हा भयानक प्रकार घडतो असल्याने सर्व जगात याची चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणात बीबीसीच्या अंडरकव्हर रिपोर्टरने माईक नावाच्या एका घरमालकाशी त्याच्या घरी जाऊन संपर्क केला. माईकने या महिला पत्रकाराला सांगितलं की त्याच्याकडे २ बेडरूमचा एक फ्लॅट असून, जर तो तिला फुकटात वापरायला मिळू शकणार आहे, मात्र एकच अट आहे तिला त्याच्यासोबत शैय्यासोबत करावी लागणार आहे. जोपर्यंत ती शरीर सुख देत राहील तोपर्यंत तिला एक पैसाही भाडं न देता या घरात राहता येणार आहे. माईकने तिला स्पष्ट पणे सागितले आहे. तर माईकप्रमाणेच एका ६० वर्षांच्या म्हाताऱ्यानेही महिला पअशीच विकृत ऑफर दिली आहे. घर फुकटात वापरायला देण्याचं आमीष दाखवलं आहे. या प्रकारे जर अट मान्य केली तर घरासोबतच महिला पत्रकाला त्याने वायफाय, वीज, गॅसही मोफत देण्याचं आश्वासन दिलं आहे.

लंडनमध्ये आता घरमालकांनी पेपरमध्ये घर भाड्याने द्यायचे आहे, यासाठी दिलेल्या जाहिरातींमध्येही उघडपणे शरीरसुखाच्या बदल्यात घर भाड्याने देण्याची तयारी असल्याचं सांगायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आता इतक्या शिक्षित आणि प्रगत असलेल्या देशात इतक्या विकृत मनोवृत्तीचे लोक असू शकतात का ? असा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे पूर्ण जगात हा विषय चर्चिला जातो आहे.