रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

पीएफ पेन्शनर्सला मिळू शकतो या योजनेचा लाभ

कर्मचारी भविष्य निधी संघटन (ईपीएफओ) चे सुमारे 60 लाख पेन्शनर्सला केंद्र सरकार दिलासा देऊ शकते. या अंतर्गत सरकार पेन्शनर्सला आयुष्मान स्कीमचा लाभ देण्यावर विचार करत आहे. असे झाल्यास पेन्शनर्सला वार्षिक 5 लाख रुपयापर्यंत हेल्थ इंश्योरेंस फ्री असेल अर्थात ते एका वर्षात 5 लाख रुपयांचे विनामूल्य उपचार घेऊ शकतील.
 
काही दिवसांपूर्वी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (सीबीटी) च्या बैठकीत सीबीटी मेंबरने ईपीएफओ सदस्यांना आयुष्मान स्कीम अंतर्गत हेल्थ इंश्योरेंसचा फायदा देण्याची मागणी केली होती.
 
सरकार या मागणीवर विचार करत आहे. ईपीएफओ आपल्या पेन्शनर्सला उपचार सुविधा पुरवण्याच्या स्कीमवर काम करत आहे. तसेच या स्कीममुळे पडणारा खर्चाला भार कोणावर असेल यावर निर्णय अडकलेले आहे. अशात केंद्र सरकार पेन्शनर्सला आयुष्मान स्कीमचा फायदा देण्याचा निर्णय करत असली तर पेन्शनर्सला फ्री मेडिकल सुविधेचा लाभ मिळू शकेल.