शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 22 मार्च 2018 (14:02 IST)

ईपीएफओच्या ऑफिसमध्ये कोट्यवधींचा घोटाळा

दिल्लीत द्वारकाधील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या ऑनलाइन ऑफिसमध्ये घोटाळा झाल्याचे वृत्त आहे. ईपीएफओच्या अकाउंटमधून कोट्यवधी रुपये काढण्यात आले. 4 कोटी रुपये काढल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. खासगी क्षेत्रात काम करणार्‍या हजारो कर्मचार्‍यांचा हा पैसा आहे.
 
या प्रकरणी ईपीएफओने द्वारकाधील पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर एफआयआर दाखल झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली असून ईपीएफओच्या एका कर्मचार्‍याला ताब्यात घेतले आहे. घोटाळा किती मोठा आहे आणि त्यात कोण-कोण सामील आहे हे चौकशीतून स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.
 
ईपीएफओद्वारे वर्षाचा ताळेबंद तपासण्यात येत असताना हा घोटाळा उघड झाला आहे. ऑनलाइन कॅश ट्रॅन्झॅक्शनची रक्क्म आणि खात्यातील जा रकमेत कुठलाही ताळमेळ बसत नसल्याचे तपासणीत समोर आले. काही ट्रॅन्झॅक्शन अशा अकाउंट्‌समध्ये झालेत ज्यांची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनाही नाही. यामुळे सुरुवातीला ईपीएफओद्वारे अंतर्गत चौकशी करण्यात आली होती.