सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 19 मार्च 2018 (15:39 IST)

चारा घोटळा, चौथ्‍या प्रकरणातही लालूप्रसाद यादव दोषी

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना  चारा घोटळ्या प्रकरण तीन प्रकरणात दोषी ठविल्‍यानंतर न्यायालयाने त्‍यांना चौथ्‍या प्रकरणातही दोषी ठरवले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे लालूंचचा तुरुंगवासा आणखी वाढणार आहे. 

चारा घोटाळ्यात एकूण सहा प्रकरणे आहेत, यातील चौथ्‍या प्रकरणावर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने  त्‍यांना दोषी ठरविले.  चारा घोटाळ्यातील तीन प्रकरणांमध्ये लालूंना याआधीच दोषी ठरविण्यात आले आहे. झारखंडमधील डुमका येथील कोषागारातून बेकायदेशीररित्या ३ कोटी १३ लाख रुपये काढल्याचा त्यांच्यावर चौथा आरोप आहे. या आरोपांवरील सुनावणी ५ मार्च रोजीच पूर्ण झाली होती. मात्र, लालूंच्या वतीनं वेळोवेळी करण्यात आलेल्या याचिकांमुळे त्यावरील निर्णय रखडला होता.  अखेर या आरोपांवर सुनावणी झाली. त्‍यात लालू यांना दोषी ठवण्यात आले तर, याच प्रकरणात माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची निर्दोष सुटका झाली आहे. 

याप्रकरणी लालू प्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा यांच्यासह ३१ जणांना आरोपी करण्यात आले होते. न्यायालयाने यातील १९ जणांना दोषी ठरवले असून, १२ जणांची सुटका केली आहे. लालूंच्या शिक्षेवर २१, २२ आणि २३ मार्चला सुनावणी होणार आहे. दरम्‍यान, चारा घोटाळ्यात लालूंना साडेतेरा वर्षांची शिक्षा झाली असून, ते सध्या रांची येथील बिरसा मुंडा तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.